Thursday, February 19, 2015

.बंधू



हॉस्पिटल च्या मुहूर्ताचा दिवस आला ,शेखरने फार सुंदर पद्धतीने बांधले होते .आवरारात शिरतानाच कुठूनही दिसावी अशी स्वामींची भाव मूर्ती आणि तिच्या मागे लावलेला "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे "असे आश्वासन देणारा एक शीला लेख अतिशय आश्वासक पद्धतीने लावला होता,दर्शनी भागात सर्व धर्म प्रार्थना स्थळ होते ,बंधूंचा एक भव्य दगडात कोरलेला पुतळा ,अन्नपूर्णा ,हे स्वयंपाक घर लहान मुलांच्या कक्षाचे नाव होते  ममता.अत्यंत कल्पक पद्धतीने होस्पिटल बनवले होते.माझे भव्य केबिन ,वहिनींचे भव्य केबिन अतिशय कल्पकतेने बनविले होते ,
शुभारंभाच्या दिवशी सर्व शहर लोटले होते माधवराव जी माजी दादा आई बाबा सारे जण व्यवस्था बघत होते शेखरचे सर्वजण कौतुक करत होते अवघडलेली वहिनी नको नको म्हणत असतानाही काम करत होती,स्वामी समर्थ नावाची रामधून चालू होती,सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडत होते,,एक फोन खणाणला माजींच्याकडे कोणाला तरी बोलायचे होते.मी    बोलतोय मला तुम्हाला भेटायचे आहे येऊ का ,"भावजी तुम्ही किती वर्षांनी तुमचा आवाज ऐकतेय ,जरूर या भावजी पण घरी नाही इथे मी युवराज सर्व हॉस्पिटल मधेच आहोत ,आलोच वहिनी ,थोड्याच वेळात रावसाहेब आणि एक व्यक्ती गाडीतून उतरले.मला आश्चर्याचा धक्काच बसला त्यांच्या बरोबर कुंतल मादाम उतरल्या ,रावसाहेबांनी सर्व हॉस्पिटल पहिले विनाशुल्क हॉस्पिटल मधले सुसज्ज ऑपेरेशन थेटर पाहून ते खुश झाले.माजीना पाहून म्हणाले वहिनी माझ्या मित्राचे नाव तुम्ही रोषन केले आहेत ,धन्य आहे तुमची आणि युवराजांची ,फक्त युवराजांची नव्हे भावजी ह्या माझ्या तीनीही मुलांची ,माजीने अम्हका तिघानाही बोलावले आणि आमची ओळख राव साहेबाशी करून दिली.युवराजांना तुम्ही ओळखताच ,हा माझा दुसरा मुलगा डॉक्टर पंचम ,आणि हा शेखर ,ज्यांनी हे हॉस्पिटल बांधले,वहिनी बंधूंना अमर केलाय तुम्ही आणि तुमच्या ह्या त्रिमूर्तीने ,आम्हा तिघानाही जवळ बोलवून आमच्या डोक्यावरून हात फिरवून त्यांनी आशीर्वाद दिले ,कुंतल मदमाने वाहिनीन बरोबर फिरून पूर्ण वास्तू बघितली पसंतीची छटा त्यांच्या
चेहऱ्यावर उमटली होती ,माझ्या केबिन मध्ये त्या आल्या ,माझ्या पाठीवर पसंतीची थाप त्यांनी मारली आणि एक बंद लिफाफा कोणाच्याही नकळत माझ्या हातात दिला .रावसाहेब आणि कुंतल सर्वाना भेटून परत निघाल्या.
कार्यक्रम पूर्ण झाल्यावर घरी गेलो ,लिफाफा फोडला त्यात एक चिट्ठी होती "पंचम आयुष्यात मला नर खूप मिळाले पण पुरुष मात्र एकाच मिळाला ,ज्यांनी माझ्या अंगावर गुरु शिष्याच्या नात्याच्या मजबूत धाग्यात विणलेले महावस्त्र पांघरले ,त्या महावास्त्राची उब कायमची पुरेशी आहे,बाबांच्या सांगण्यावरून मी घर हॉस्पिटल साठी दिले आहेत कारण आता नि कायमची इथेच राहणार आहे,काहीच दिवसात इनामदार
वकी तुला भेटतील,तूअनमान करणार नाहीस ...कुंतल.


 कळत हात स्वामींच्या पुढे जोडले गेले बंधूंचे शब्द आठवले तारण तलावाच्या   चुल्भर पाण्यात तुम्ही बुडणार नाहीत ह्याची खात्री आहे आम्हाला,घसरलो होतो पण तुळशीपत्राने सावरलं होते,थकून गेल्याने झोप लागली ,पहाटेच जाग आली टायगर भुंकण्याने टायगर आत आला आणि मला पराजात्काच्या झाडाकडे घेऊन   गेला पारिजातक पुन्हा अवेळी फुलाला होता.

दुसर्या दिवशी सकाळी ,हॉस्पिटल मध्ये मी आणि वाहिनी गेलो ,सर्व जुनियर डॉक्टर आणि स्टाफ opd मध्ये आले सर्वाना मी आणि वहिनीनी काम समजून सांगितले ,वाहिनी रुग्णांना बघत होत्या इतक्यात त्यांना पोटात दुखायला लागले .घरी फोन करून सांगून मी मेट्रन आणि लेडी डॉक्टर च्या मदतीने लाबोर रूम मध्ये नेले , वाहिनी म्हणाल्या पंचम काळजी करू नकोस डिलिवरी नॉर्मल होईल ,काही लागलेच तर मेत्रोन तुला आत बोलावतील,बेस्ट ऑफ लक वाहिनी. लेडी डॉक्टर ने दरवाजा बंद केला ,एवढ्यात आई माजी बाबा दादा सर्व जन आले दादा थोडेसे नर्वस वाटत होते ,फार दुखतंय का तिला दादा मला म्हणाले ,त्याला काय विचारताय युवराज ह्या कला किती भयंकर तरीही सुखद असतात हे त्याला काय कळायचे ते काळात फक्त एका आईलाच , मिनटात दरवाजे उघडून मेट्रन आणि डॉक्टर बाहेर आल्या अभिनंदन माजी तुम्ही आजी झालात ,अभिनंदन युवराज तुम्ही बाबा झाले आहात ,अभिनंदन डॉक्टर पंचम आपल्या हॉस्पिटल मध्ये झालेला पहिला जन्म आहे, , डॉक्टर पंचम प्रोतोकॅल प्रमाणे आपण प्रथम आत जाऊन बाळआला चेच्क करून मग इतरांना पाठवावे मेट्रन म्हणाल्या,दादांना चिडवत मी प्रथम आत गेलो वाहिनीन बाळाला तपासले आणि मग सर्वाना आत सोडले दादा आई माजी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दाटला होता ,बाळ चांगले गुटगुटीत होते ,हॉस्पिटल चे सर्व सहकारी मला अभिनंदन करायला जमले सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता,टायगर हि त्या आनंदात सामील झाला होता ,त्यालाही जणू बाळाला आणि वाहिनीन बघायचे होते ,वाह्निनी आतूनच आवाज दिला टायगर मी बरी आहे आणि बाळही ,जणू कळल्या सारखे करून तो आनंदाने भुंकला,थोड्या वेळाने माझ्या आणि दादाच्या कपड्यांना पकडून ओढू लागला ,काय झाले मी विचारले भुंकत भुंकत आम्हाला ओढून तो दर्शनी भागात घेऊन आला ,आणि स्वामी आणि बंधूंच्या फोटोसमोर उभा राहिला जणू त्यांना प्रणाम करायलाच तो सांगत होता,आमचे दोघांचेही डोळे पाणावले दादांनी मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले आजचा दिवस पाहायला बंधू शरीराने नाहीत पण मानाने इथेच आहेत.आपल्या सर्वांच्या जवळ.माझे हि मन भरून आले होते त्यांच्या आठवणीने डोळे पाणावले माझे दुक्ख दादांच्या मिठीत मी मोकळे केले,.

हॉस्पिटल आणि अभ्यासाच्या  व्यापा पुढे मला कुठेही बघायला वेळ मिळत नव्हता ,राज्य सरकारने आणि अनेक सेवाभावी संस्थांनी 
 हॉस्पिटल च्या कार्याची दाखल घेतली ,आजू बाजूंच्या पंचक्रोशीत "बंधू"हे नाव आदराने उच्चारले जात होते ,माजी आणि आई जातीने हॉस्पिटल च्या अन्न पूर्णे कडे लक्ष घालत होत्या ,,सर्व काही आल बेल होते ,पण मन सदैव स्वामी वचनाची आठवण करून द्यायचे ,तू मी आणि बंधू कधीही दूर होणार नाहीत,मग मला ते नसल्याची आठवण का छळते येणारा माणूस जाणार हे माहित असूनही मी ते नाही आहेत आणि कधीही मला परत भेटणार नाहीत हे समजू का शकत नाही ,स्वामिनी सांगितलेल्या वचनाचा अर्थ काय का ते एक स्वप्नाच होते ,काहीच कळत नव्हते , नव्हते ,दिवसभराच्या थकव्याने झोप आली ,पाहते पहाटे एक तेजाचा पुंज खोलीत पसरला साक्षात स्वामी उभे दिसत होते ,तू मी आणि बंधू हे एक त्रिदल आहे एकमेकांपासून कधीही दूर होणारे ,आमच्या ह्या वचनाची खात्री तुला लवकरच पटेल , तुमचे एकमेकांचे नाते कालातीत आहे आणि तसीच तुमची माझ्यावरची भक्ती प्रेम आणि भक्ती ह्या अडीच अक्षरी अद्वैताचा एक जिवंत साक्षात्कार तुला होईल हे आमचे वाचन आहे तू आणि बंधूंचे नाते मृत्यू संपवू शकणार नाही ते निरंतर अबाधित राहील त्याला सदैव आमचा आशीर्वाद राहील ,शांत झोप तुला दिलेले कार्य करत राहा .त्या अशीर्वाचानाने शांत झोप लागली ,सकाळी उठलो आणि बंधूंच्या फोटो समोर उभा राहिलो .त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू पाझरत होते ज्याच्या स्पर्श केवळ माझ्यासाठीच होता.




[1]क्रमशः 

No comments:

Post a Comment