Monday, February 3, 2025

कुंतल

         कुंतल
कुंतल
किती सुंदर पोहता तुम्ही,एक अनोळखे शब्द कानानावर पडले ,अभ्यासांनी थकून एकटाच तलावात उतरलो होतो ,आजू बाजूला लक्षही नव्हते ,आपल्याच मस्तीत पोहत होतो ,बाहेर आमच्या प्रोफ.dr .कुंतल उभ्या होत्या ,"माझ्या कडे बघून म्हणाल्या मी हि पोहते पण तुमच्या सारखे संथ आणि शांतपणे पोहता येत नाही मला .एखाद्या राज हंसाने पोहावे तसे डौलदार पोहता तुम्ही ,मला शिकवाल ,मी काय तुम्हाला शिकवणार मादाम ,खर तर त्यांच्या स्तुतीने मी सुखावलो होतो, डॉक्टर कुंतल आमच्या महाविद्यालयातल्या एकतरुण आणि ख्यातनाम प्राध्यापिका ,नुकत्याच त्या आमच्या कॉलेज मध्ये आल्या होत्या ,त्यांची शिकवण्याची हातोटी ,विषयावरचे प्रभुत्व ,रुबाबदार आणि सुंदर व्यक्तिमत्व ,आणि बाकी प्राध्यापकान पासून आपले वेगळेपण दाखवणारे अलिप्त वृत्ती सारे काही गूढ वाटायचे ,आपल्या कोऱ्या करकरीत गाडीतून डॉक्टर .कुंतल जेव्हा यायच्या तेव्हा तेव्हा त्यांचे वेगळेपण आम्हाला नकळत जाणवायचे ,,बर्याच वेळेला आमचे वरिष्ठ प्राध्यापकही त्यांना वचकून असायचे ,त्यांनी माझ्या केलेल्या स्तुती मी नुसता गोंधळ लोच नाही तर स्तब्ध हि झालो , माझ्या कडे पाहून त्या म्हणाल्या ,असुदे तुमच्या अभ्यासामुळे जमत नसेल तर राहूदे ,तस नाही मादाम ,माझे शब्द रोखताच त्या म्हणाल्या ,please हे मादाम चे ओझे आतातरी उतरवू दे मला ,प्रोफेसर आणि मादाम च्या झुलीखाली जीव कासावीस होतेय ,माझे ,माझे नाव कुंतल आहे कुंतल सरंजामे,आणि वर्गाच्या बाहेर तरी मला त्या नावाने कोणीतरी हक मारावी अस मला वाटते ,ह्या प्रोफ दर.कुंतल ला मोकळा श्वास घ्यायचाय,कुंतल आणि फक्त कुंतल ह्या नावाने कुठलीही प्रिफ़िक्स आणि सुफ़िकस न लावता, मला हि तुमच्या सारखेच काही क्षण मित्र मैत्रिणी बरोबर घालवावे ,आणि ह्या निरास आणि बेचव आयुष्याला काही मैत्रीचे सुखद क्षण लाभावेत ,असे वाटते ,बोलता बोलता मदमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आपले डोळे पुसतच त्या म्हणाल्या sorry पंचम माझ्या वैयक्तिक अडचण कारण नसता मी तुम्हाला सांगितल्या ,मला क्षमा करा ,
वय आणि नात्यातले अंतर विसरून गेले मी ,एका बेसावध क्षणी एकटे पानाची खोल जखम भला भाळून वाहायला लागलीय,"पोरकी पोर"हो हो पोरकी पोर वयाच्या ८ वर्षी आई वडलांच्या प्रेमाला पारखी झालेली ए अनाथ मुलगी .पित्यांनी ठेवलेल्या अफाट संपत्ती आणि बुद्धिमत्तेचे वरदान आणि आई कडून मिळालेले हे सौंदर्याचे वरदान ,माझ्या बाबतीत मात्र शाप ठरलॆ आहे ,ह्या मुळे मला आपले म्हणणारा मायेने पाठी वरून फिरणारा एक हात मात्र मिळाला नाही ,उद्योग पती बाबा साहेब सरंजामे माझे वडील मला एकटीला आई कडे सोडून समाज कार्य करण्या साठी मध्यप्रदेश मध्ये गेले ,आणि माझी आई माजी सिने अभिनेत्री रुप देवी मला घेऊन लंडन ला गेली तिथे माझेपूर्ण शिक्षण झाले ते एका गवेर्नेस च्या हाता खाली ,बाहुला बाहुलीचे लग्न लावायच्या वेळेला माझ्या आई चे परदेशात लग्न लागत होते एकदाच नव्हे तर अनेकदा ,माझ्या वाट्याला आली ती कोरडी शिस्त ज्या वयात कळीचे फुलात रुपांतर होत असते त्या वेळेला मला दिसत होते माझ्या आईचे होणारे ४ थे किवा ५वे लग्न.,ज्या वयात मुलींच्या शरीरात बदल होत असतात त्या वेळेला माझ्या वाटयला आले होते शरीर शास्त्राचे पुस्तक,आई चा पाठीवर फिरणारा हात नव्हता न बापाच्या प्रेमाचे छत्र ,एखादे अनाथ मुल वाढावे तशी वाढली मी ,धनवान बाप आणि रूपसुंदर आईची एकुलती एक मुलगी आईचे प्रेम आणि बापाचा धाक ह्याचा पुसटता स्पर्श हि झाला नाही मलादारू पिउन पिउन आई मेली आणि मी लंडनहून भारतात आले ,मला वाटले वडील तरी आधार देतील मला पण ते तर मध्यप्रदेश मध्ये अनाथाश्रम चालवत होते ,स्वतःच्या मुलीला अनाथ करून बाप अनाथाश्रम चालवत होता ,कारण तिला सांभाळून समाजात नाव होणार नव्हते कि एखादी पद्मश्रीही मिळणार नव्हती ,आई बरोबर मला हा देश सोडून परदेशात राहावे लागले ,मला एका गवर्नेसच्या ताब्यात देऊन माझ्या आईने माझे शिक्षण पूर्ण केले, मी हि तिथे शिकले अगदी डॉक्टर व्हायचे ह्या जिद्दीने शिकले,विद्यापिठाच्या सर्व परीक्षात मी प्रथम श्रेणीत उतीर्ण होत होते कारण अभ्यासाशिवाय मला इतर काही आयुष्यच नव्हते ,नाना रंग उधळून आणि पिउन पिउन माझी आई हे जग सोडून गेली पण जाताना सांगून गेली कि तू मायदेशी परत जा ,आणि मी तिथून इथे आले आणि हा व्यवसाय स्विकारला , पंचम तुम्हाला पोहताना पाहून माझे बालपण पुन्हा एकदा जागे झाले ,तुमची टीचर म्हणून नव्हे तर मैत्रीण व्हायचे आहे मला ,हि मैत्री चालेल ना तुम्हाला ?








माझ्यासौंदर्यावर भाळणारे अनेक पुरुष मला भेटले,पण ज्याच्या मर्दानी सौंदर्यावर मी मोहित झाले असा एकच पुरुष मला दिसला ,आजपर्यंत मी माझ्याच सुंदरतेच्या गुंत्यात एवढी अडकलेली असायची कि दुसर्या कोणाकडे माझे लक्षच जात नसायचे ,माझा ब्रिटन मधला सहाध्यायी बुर्तोन नेहमी म्हणायचं कि कुंतल तू स्वतःच्या प्रेमात एवढी गुरफटली आहेस कि दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीवर तू प्रेमच करू शकणार नाहीस,तू आहेस एक पूर्ण प्रथम पुरशी एक वचन,you are male नार्सिसस .कोणावर प्रेम करणे शक्यच नाही तुला , मी मात्र त्याच्या ह्या सल्ल्या कडे दुर्लक्ष करून म्हणायचे ब्रूत ह्यात असूयेचा भाग किती आणि वस्तुस्तिती किती ?dam it तुझ्यासारख्या रबरी बाहुलीवर प्रेम करायला मी वेडा आहे का ?प्रेमाने तुझ्या ओठांवर ओठ ठेवताना आपल्या लिपस्टिक चा रंग पुसण्याची भीती मला तुझ्या डोळ्यात दिसेल आणि प्रणयाचे सगळे रंगच फिके होतील, अगदीच खोटे नव्हते त्याचे बोलणे आज मात्र मी मनोमन एका पुरषाच्या प्रेमात पडले होते , तलावात पोहायला आले आणि सपशेल प्रेमात पडले .एक व्यक्ती पोहत होती अन पोहता पोहता तो काठावर आला त्याचे शरीर पाण्यातच होते मला फक्त दिसत होते त्याचे काठावर विसावलेले दोन हात .लांब सडक बोटे आणि नखांचा गुलाबी सतेज रंग आणि पिळदार तरीही कोवळे वाटणारे दोन बलदंड बाहू आणि ते उभे करताना दिसणारी काखेतली नवथर कश्मीरी कलाकुसर,,मी त्याच्या नजरेला पडू नये म्हणून हळूच बाजूला लपले ,निशंक मानाने हातांवर जोर देऊन तो बाहेर आला ,त्याचा बलदंड बाहूंची हालचाल सांगून गेली कि ह्यांच्या मिठीत किती उबदारपणा असेल, एखादे संगमरवरी तरीही जिवंत शिल्पा पाण्यातून बाहेर यावे तसे त्याच अस्तित्त्वा भासत होते ,कुरळे दाट केस,उंच आणि भरीव मान बलिष्ठ तरीही कोवळ्या शिंगाराप्रमाणे भासणारी शरीर यष्टी ,राराशित संत्रांच्या फोडी सारखे दिसणारे ओठ,रुंद आणि बलिष्ठ छाती आणि त्यावर जडवलेली दोन माणके,अंगावर असलेल्या छोट्याश्या वस्त्रातून दृग्गोचर होणारे पौरुष्याचा अविष्कार ,छाती पासून नाभी पर्यंत उगवलेली एक सोनेरी केसांची नाजूक उभी पखरण , सौंदर्य हि किती मोहक असू शकते ह्याचा एक जिवंत अविष्कार माझ्या पुढे उभा होता ,,डोळे चोळून बघितले तर तो पंचम होता माझ्याच वर्गातला एक हुशार विद्यार्थी ,त्याच्या हुशारीची साक्ष म्हणजे अभ्यास,खेळ,वक्तृत्व सर्वच क्षेत्रात मिळालेली बक्षिसे ,अतिशय शांत स्वभावः हा विद्यार्थी सगळ्यांचाच आवडता होता ,त्यांच्या मित्र मैत्रिणींचा हिरो होता ,प्राध्यापक वर्गाचा आवडता शिष्य होता ,माझा मात्र त्याच्यशी फारसा संबध आला नाही. सौंदर्याच्या त्या प्रथमपुरुषी एक वचनी अविश्कारानी माझ्यातली मादी अचानक हुंकारली हा नर माझा आहेआहे. मला पंचम हवा होता ,आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार होते,पण आड येत होते हे गुरु शिष्याचे नाते.मम्मा नेहिमी म्हणायची की बेबी बिछान्यावर एकच नाते उरते ते म्हणजे नर आणि मादीचे ,,मम्माचा हा फंडा मला आवडला आणि त्याचाच उपयोग करायचे मी ठरवले. मला पंचम हवा होता ,आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार होते,पण आड येत होते हे गुरु शिष्याचे नाते.मम्मा नेहिमी म्हणायची की बेबी बिछान्यावर एकच नात उरते ते म्हणजे नर आणि मादीचे ,,मम्माचा हा फंडा मला आवडला आणि त्याचाच उपयोग करायचे मी ठरवले.
एक दिवस संध्याकाळी पोहता पोहता मी पडल्याचा बहाणा केला पंचम ला मला तलावातून गाडीत उचलून न्यावे लागले ,माझ्याच गाडीतून बंगल्यावर पोहचवायला सांगितले .पंचम माझ्या बरोबर बंगल्यात आला ,तलावातून बाहेर काढताना आणि मला पकडून घरी नेताना ,मी शक्यतो भार त्याच्या शरीरावर देत होते,त्याच्या मनातली चलबिचल मला जाणवत होती ,एक भीती ,एक न्यात्यानी उभे केलेले एक बंधन आणि तरीही त्या आडून उमटत जाणारी शरीराची हाक,सगळ कसे जमून येत होते.माझ्या बेड रूम मध्ये गेल्यावर आईग म्हणून मी जोरात ओरडले,काय झाल कुंतल पंचम म्हणाला ,आज प्रथमच प्रथम म्याडम आणि कुंतल म्हणता तो सरळ कुंतल म्हणाला.काही नाही मला बेड वर चढता येत नाही आहे आणि मला हेल्प करायला सारजा बाई हि नाहीत ,मग काय झाले मी आहे ना,त्याचा घोघारा आवाज सांगत होता की त्याच्या तला नर जागा होतोय,आवाजात वेदना शक्य तितक्या जाग्या ठेऊन मी बोलत होते,मम्मा चे शब्द कानावर घोंगावत होते बेबी नराला त्याच्या पुढे पूर्णपणे अगतिक झालेली मादी पाहिजे असते ,कमीत कमी तस भासले तरी पाहिजे विजयाचा खोटा एक क्षण त्याला दे आणि कायमचे पराभूत कर.कारण अहंकार हि पुल्लीन्गीच असतो .बेबी अग कुठलेही नात्याचे नियम नर मादीच्या नात्यात उरतच नाहीत.पंचम ने अलगद मला उचलले आणि आपल्या बळकट बाहूंच्या आधाराने बेड वर ठेवले ,त्याच्या शरीराची धग मला जाणवत होती,त्याच्या बोटांची चाचपडणारी अग्रे मला सुखद स्पर्श जाणून देत होती.काळात होते की गुरु शिष्याच्या नात्याची आहुती आता ह्या भडकत्या आगीत दिलीच पाहिजे हा क्षण निसटला तर परत हि संधी यायचीच नाही.बेड वर मला ठेवताच न जाणे माझ्या नशिबाने कशी साथ दिली आणि रूम मधले लाईट गेले,संधी साधून मी पंचम ला घट्ट आवळले ,त्याच्यातला नर आता पूर्ण जागृत झाला होता ,अंधाराच्या साथीने त्याचीही भीड चेपली होती,मला त्याच्या अनाघ्रात पौरुष्याचा प्रमाथी गंध मोहवत होता,त्याच्या चाचपड णाऱ्या स्पर्शाला मी रस्ता दाखवत होते ,शरीराला शरीर भिडत होते ,,माझ्यातली मादी हुंकार घालत होती एका नराला,त्याचे पौरुष्या सामावून घेण्याचा माझा प्रयत्न मी करत होते ,एका सशक्त आवेगाने त्याची मिठी आवळली गेली शरीराला शरीर भिडले होते ,त्याचे हात मला जास्तीत जास्त जवळ घ्यायचा प्रयत्न करत होते,माझे हातही त्याच्या शरीरावरून फिरत होते ,त्याच्या मानेजवळ जाताच मला त्याची गळ्यातली चेन हाताला लागली ,त्याच्यात गुंफलेले तुळशीपत्र मला टोचू लागले ,आमच्या दोघात कुणीही तिसरे नको म्हणून मी त्या चेनला हिसडा मारला आणि ते बंधन दूर करण्याचा प्रयत्न केला ,,ति चेन तुटली आणि त्यातून ते तुळपत्र घरंगळून पडले पडता पडता त्याचा आवाज आला,त्या आवाजाने पंचमची मिठी सुटली अनोळखी माणसाला दूर करावे तसे त्यांनी मला दूर केले ,माझ्या अनावृत शरीरावर एक चादर घालून तो दूर झाला.जाता जाता माझ्या पायावर त्याने डोके ठेवले,त्याच्या डोळ्यातले काढत अश्रू माझ्या पायावर पडले.एक नाजूक निर्जीव तुळशीपत्र पराभवाचे माप माझ्या पदरात घालून गेले.सौरी मादाम म्हणून मला पंचम दूर लोटून गेला. आग विझली आणि आणि मी मात्र पूर्णपणे जळून गेले ,अस काय झाले की माझ्यातली मादी हरली होती,काहीच कळेना ,पण एवढे मात्र कळून चुकले की मला नर भेटला नव्हता तर एक पुरुष भेटला होता माझ्यातली मादी त्याच्या पुढे हरली होती.हा अध्याय आता संपला होता ,.ग्लानी ने झोप आली ,स्वप्नात दिसले एक दिमाखदार तुलसीपत्र ,सुंदर नाजूक आणि विजयी भासणारे,आणि मी एका कोपऱ्यात पडलेली दिसत होते सुकलेल्या निर्माल्या सारखी.जे देवपूजेला वापरता सुकले होते..माझ्यातल्या मादीचा हा सपशेल पराभव होता ,मम्माने सगळ सांगितले पण एक मात्र ती विसरली ते म्हणजे शरीर आणि मन कधी कोण कोणावर मात करतील सांगता येत नाही.सकाळी उठून वर्गावर जायचे नव्हतेच सुट्ट्या लागल्या होत्या नोकरीचे राजीनामा पत्र लिहून मी प्राचार्यांच्या हातात दिले.मी आता मोकळी झाले होते ,विषयाच्या सर्व बंधातून मुक्त झाले होते ,घरी आल्याआल्या बाबांना फोन केला त्यांना सांगितले मी त्यांच्या आश्रमात येतेय म्हणून ,ये बाळ तुझी इथे गरज आहे ,बाबा म्हणाले.गाडी काढली आणि निघाले जाताना माझ्या जवळ होते ते महावस्त्र जे पंचम ने माझ्या शरीरावर घातले होते..




Friday, March 27, 2015

cover tulshipatra

             





शशांक रांगणेकर 
९८२१४५८६०२

Tuesday, March 24, 2015



 तुळशीपत्र 
                                             
                                       




शशांक रांगणेकर 

Monday, March 23, 2015

मनोगत

                                                                         

मनोगत 
                                                                         

स्वामी समर्थ हे माझे लाडके दैवत . अगदी "माझा स्वामी "म्हणण्या इतके . मी त्याची फार उपासना करतो पूजा अर्चा करतो अशातली गोष्ट नाही ,पण तो सदैव माझ्या बरोबर आहे हि अनुभूती मात्र कायमची मनात तेवत असते . तो माझा कोण आणि मी त्याचा कोण ?ह्या प्रश्नाचे नेमके उत्तर माहित नसूनही तो माझा इतका  जवळचा आहे तेवढ्या जवळचे कोणीच नाही हि जाणीव मात्र मनात कायमची उमलत असते .त्याच्या आणि माझ्या नात्याला नाव नाही  कारण एखाद्या नात्याला नावाचे लेबल चिकटले कि त्याच्या मर्यादा अधोरेखांकित होतात .अगदी  आई बाप काका मामा मित्र गुरु सुद्धा ,पण इथे मात्र तसे नाही काही  नाती एवढी व्यापक असतात कि बळीच्या अवतारा  सारखी तिन्ही लोक व्यापूनही दशांगुळे अव्याप्त राहणारी . जेव्ह्या नात्याचे स्वरूप एवढे अमर्याद असते तेव्हा त्याला अमरत्वाची तेजस्वितता येते . 
"तुळशीपत्र 'हि अशीच कहाणी आहे जन्म आणि मृत्युच्या सीमा रेषा पार करणारी आणि स्वामींच्या इच्छेने गत जन्माची खुण सांगत पुनर्जन्म घेणारी . हि कथा हे त्यागाचे ,पावित्र्याचे ,आणि निरलस प्रेमाचे प्रसादचिन्ह आआःए. आवड ,प्रेम भक्ती ह्या एकाच भावनेच्या चढत्या कमानी आहेत . 
नात्याच्या सर्व लौकिक अर्थाना पार करून पुढे जाणारे नाते मग ते माणसाचे माणसाशी सो अथवा  परमेश्वरा शी  असो ते एका अत्त्युच्या पातळीवर पोहचते ,ह्या कथेतील तीन मुख्य पत्रे "बंधू पंचम आणि स्वामी ह्यांच्या अनुपम नात्याची हि कहाणी आहे ,ह्या नात्याला काय म्हणावे सगळेच अगम्य आणि अतर्क्य ,"मै  गया  नाही अभीभी जिंदा हु "असे सांगणाऱ्या स्वामींच्या  अमरत्वाची प्रचीती देणारी एक अमर प्रेम कहाणी ."ह्या अलौकिक त्रिकोणात वर्तमान भूत आणि भविष्य सारे काही बंदिस्त आहे कारण ह्या सर्वांचा   एकमेव   स्वामीही    तोच आहे 


                                                                         "श्री स्वामी समर्थ "


शशांक  रांगणेकर 

Tuesday, March 3, 2015

पुनरागमन


                           पुनरागमन

दुसऱ्या  दिवशी संध्याकाळी माझा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला .सत्काराच्या  वेळी दादांचा फोन आला कि मला मुलगा झाला आहे. शेखर खुणा करून मला हि बातमी कळवत होता .सत्कार समारंभ  संपवून आम्ही हॉटेल वर गेलो .दादांनी फोन वरून सांगितले कि बाळ  आणि मंजुषा सुखरूप आहेत आणी  झोपली आहेत, आदि मात्र झोपला नव्हता ,बोबड्या भाषेत म्हणाला "काका आपल्या कडे बाल आला आहे ,लवकर बघायला ये "."उद्याच येतो "मी म्हणालो ,इथली काळजी करू नकात ,बाळ बाळांतीण दोघेही सुखरूप  आहेत ,वाहिनी म्हणाल्या ,सत्काराचा कार्यक्रम सर्वांनी दूर दर्शन वर बघितला होता .

"पंचम झोपूया आता "शेखर म्हणाला फ्लाईट पहाटेची असल्याने आम्ही झोपलो ,थकल्याने बिछान्यावर पडतापडताच  झोप लागली . डोळे आसवानी भरून आले होते सुखाच्या राशीवर असूनही मी दुखखी  होतो ."स्वामी सगळे दिलेस पण हे बघायला माझे बंधू कुठे आहेत ,त्यांचा तो प्रेमळ स्पर्श मला आज पाहिजे होता
त्या वाचून मी भिकारी आहे रे "डोळे पाझरत होते आणि मनही  हलकेच झोप लागली ,पाहटे पहाटे स्वामींच्याच
शब्दांनी जाग आली "तू जिथे तिथे तो आणि मीही  उद्याच तुला आमच्या शब्दांची प्रचीती येइल. "

सकाळी विमानात  बसलो ,मन घराकडे घिरट्या मारत होते ,विमानतळावर दादा आणि आदी आले होते ,"काका बाल आला आहे पण तो सारखा रडतोय आमच्याशी खेळत नाही तो आजीने त्याला बांधून ठेवले आहे "अस का ?
आपण सोडवूया त्याला    मग आपण खेळूया मी म्हणालो .गाडी हॉस्पिटलच्या आवारात शिरली ,मी उतरताच टायगर ने भुंकून मला स्वामी आणि बंधूंच्या फोटो समोर थांबवले ,तिथे डोके ठेऊन मी आत गेलो.


आई ,माजी , वाहिनी मंजुशाच्या रूम मध्ये होत्या  बाळ  रडण्याचा  आवाज येत होता ,मंजुशाच्या चेहऱ्यावर सुखाची साय दाटली होति.        घे बाबा बाळाला माजी म्हणाल्या आणि बाळाला अलगद उचलून त्यांनी माझ्या हातात दिले ,मी आनंदाने बाळाला कवटाळले ,"स्वामी समर्थ "मन हुंकारले "मानत विचार आला आज तुम्ही असायला हवे होतात बन्धु.  बाळा नि  इतक्यात माझ्या अंगावर सुसु केली ,,आईने दुपटे सोडवले ,आणि आई आणि माजी बाळाला पुसू लागल्या, माजींचे  लक्ष बाळाच्या छातीकडे गेले त्याच्या छातीवर एक सुस्पष्ट कुणालाही कळेल अ शी तुळशी पत्राची जन्म खूण  होति.

"बंधू माझ्यासाठी परत आलात ना "मनात विचार उमटले  नकळत स्वामींच्या फोटो कडे लक्ष्य गेले  माझा स्वामी माझ्या कडे बघून मिश्किलपणे  हसत होता फ़ोटोच्या  गळ्यातले बिल्व पत्राचे त्रिदल एका वेगळ्या आणि अपूर्व तेजाने  नाहून निघाले होते ,बंधूचा पारिजात फुलांनी बहरला होता .

बंधू तुम्ही माझे कोण ?मनात प्रश्न आला , मला माहित नाही  स्वामींना विचार , मलाही माहित नाही  उत्तर आले पण आकाशातून . श्री  स्वामी समर्थ'
शशांक रांगणेकर

९८२१४५८६०२ 

सोहळा

           सोहळा               
मंजुषा च्या वडिलांची   घरच्या नि   घेतली आणि आमचे लग्न रीतसर ठरले ,आई आणि माजीनी शेखरचे हि लग्न ठरवले ,दोन्ही विवाह  सोहळे एकाच दिवशी संपन्न झाले ,दादांना पाया पडताना दादांनी  मला मिठी मारली ,तुम्हाला  आशीर्वाद   देतो कि दिन दुबळया च्या  सेवेत  तुमचे आयुष्य संपन्न होऊ दे ,तुमचे बंधू तिथेच तुम्हाला भेटतील .दादा म्हणाले"   बंधूंच्या आठवणीने मन परत पाझरले डोळ्यातून अश्रू वाहायला लागले .
आयुष्यात सुख ओसंडून जात होते ,रुग्णसेवे पुढे मला आणि मंजुषा ला  वेळ कमी पडत असे ,मंजुषा  कधीही तक्रार करत नव्हती ,वाहिनी सारखे तीनीही रुग्ण सेवेला बांधून घेतले होते .

मंजुषा गरोदर असल्याची बातमी तिनी मला सांगितली वहिनीनी तपासणी  करून त्यावर शिक्का मोर्तब केले. घरात सगळ्यांनाच आनद झाला आई ,माजी ,आणि वाहिनी ह्या तीन देवियांच्या निगराणी खाली मंजुषा चे कोड कौतुक होत होते. आनंदाचा क्षण जवळ येत होता .

एक दिवस राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागातून फोन आला बंधू रुग्णालयाच्या अपूर्व कामगिरी साठी केंद्र सरकार तर्फे माझा सत्कार होणार होता राष्ट्रपती भवनात हा सोहळा संपन्न होणार होता ,
शहरात हि बातमी कळली आणि बंधूवर लोकांची रीघ लागली ,हॉस्पिटलच्या सहकार्यांच्या उत्साहाला उधाण  आले होते .त्यनि सर्वत्र रोषणाई केली होती ,सतत स्वामी धून वाजत होति. दादांनी मला स्वामी आणि बंधूंच्या फोटो पुढे नेले माझ्या डोक्या वरून हात फिरवला माझ्या मस्तकाचे  अवघ्राण करून ते म्हणाले "बंधू बघितला का हा आपला पंचम केवढा मोठा झालाय तो ,आगदी आभाळा येवढा त्याला आशीर्वाद द्या कि त्याच्या आभाळ मायेचे पांघरूण अनेक दिन दुबळ्यांना लाभू द्या .स्वमि कृपा त्याला सदैव साथ करू द्या .दादांच्या डोळ्यातून  वाहणारे अश्रू माझ्या डोळ्यातून पाझरणाऱ्या  अश्रूत कधी सामावले ते कळले पण नाही .

दुसर्याच दिवशी दिल्लीला निघायचे होते ,मंजुषा चे दिवस भरत आले होते ,मी आणि शेखर दिल्लीला निघालो ,मंजुषाला अश्या अवस्थेत  सोडून जाताना माझ्या मनात काळजी डोकावत होती ,'माझ्या चेहऱ्या वरची काळजी पाहून    मंजुषा म्हणाली   तुम्ही काळजी करू नकात स्वामी आहेत माझ्या बरोबर ". मनावरचा मोठा बोझा  उतरला आणि काळजी 
स्वामींच्या पायाशी सोडून मी आणि शेखर दिल्लीला निघालो 

Wednesday, February 25, 2015

प्रचीती












काळ कधीही कुणासाठी थांबत नाही,थांबतात त्या आठवणी
हॉस्पिटल व्यवस्तीत चालले होते. वाहिनी आणि मी सर्वत्र लक्ष्य ठेवून होतो. दादांचेही लक्ष्य हॉस्पिटल वर होते. आई आणि माजी दररोज ,प्रसूती कक्षा कडे फेरी मारायच्या.एखाद्या घाबरलेल्या पहलटकारणीच्या पाठीवरून हात फिरवून तिला धीर द्यायच्या,त्यांच्या आवडी निवडी कडे जातीने लक्ष द्यायच्या जेवणाच्या वेळी स्वतः थांबून वेळ प्रसंगी त्यांना भरवायच्याही . मी आणि दादा त्यांची थट्टा  करायचो त्यांनी खास बनवलेला शिरा आम्हालाही हवा आहे म्हणून हट्ट धरायचो,आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या स्त्रिया आणि साधन वर्गातल्या स्त्रिया ह्यांच्यात हॉस्पिटल मध्ये कधीही भेदभाव केला होऊ नये म्हणून सतत सतर्क राहत.

       बंधू  दिन दुबळ्यासाठी मोठा आधार होता. कुंतलने दिलेल्या बंगल्याचे मुलींसाठी निशुल्क वसती गृह    करण्याचे ठरले. ह्या दोन्ही संस्थाना जनता जनार्दनाने भरघोस  पाठींबा दिला स्वामीच जणू ह्या संस्थांचे चालक झाले होते,  त्यांच्या आशीर्वादाची प्रचीती आपले आस्तित्व दाखवत होते. त्यांच्या कृपेने बंधूला काहीही कमी पडत नव्हते,देश परदेशातून मदतीचा ओघ वाहत होता ,बरचसे परदेशी रुग्णही बंधुमधून उपचार घेत होते.बंधू परदेशातही प्रसिद्ध झाले. अनेक सेवाभावी संस्थानि ,मान्यवरांनी बंधूलानावाजले, सन्मानित केले.

आदित्य दादांचा मुलगा माझ्याकडे फारच अट्याचड होता दिवसातू "प काकांनी "एकदातरी उचलल्या शिवाय गुलामऐकायाचा नाही ,दादा वाहिनि पेक्षा "पकाका"अधिक जवळ    वाटायचा.तक्रारीच्या सुरात दादा म्हणाले"कुठल्या जन्माची   दुष्मनी काढताहेत पंचम "बंधूननाही चोरलेत आणी आतातरआमच्या आदिलाही "आणि तुम्हाला स्वतःला तरी सोडलाय का मोकळे?दिवसातून दहा वेळा विचारता पंचम जेवला,का त्यांनी काही खाल्ले  का?दहावेळा प्रश्न विचारून मला  हैराण करता पंचम लहान का आहे एवढी  करायला  ?   

सारखे प्रश्न विचारात असता हैराण होते मी तुमच्या      प्रश्नांनी ,आता लहान का आहे तो आणि तुमच्या साठी मोठा कशी व्हायचा तो ?आता लग्नच करते त्याचे आणि मग छोटा पंचम आला कि मग मोठा वाटेल तुम्हाला तो" माजी म्हणाल्या "इतक्यात तरी नको माझ्या  दादाचा लहान भाऊ म्हणून लाड पुरवून घेऊ द्यात मला मी म्हणालो" तू राहशील पण मी बरी राहू देशील मला तुझे आणि शेखरचे लग्न लवकरात लवकर करायचे आहे होना?       आई कडे पाहून माजी म्हणाल्या ,"हो तर आगदी लगेच    मुलगी बघायला सुरवात करूयाच आपण "आई दुजोरा  देत म्हणाली . "पंचम साठी मुलगी बघायला हवी आता ,   काहीही नको वहिनी,माझ्या ह्या दोन्ही सास्वांचे श्रम वाचावे म्हणून माझ्या लाडक्या भावजीनने त्यांचे कामं हलके केले आहे ,मुलगी त्यांनीच पसंत केली आहे वहिनी म्हणाल्या, कोण ग ?कायरे पंचम नाव सांग ना ?मला नाही माहित वहिनीनच विचार ?ह्याला त्याला कशाला भावजी डॉक्टर मंजुषाला विचारुया ?चालेल न भावजी ,   चालेल का ? धावेलाही वहिनीसाहेब "मी म्हणालो आणि आदी आणि टायगर घेऊन खोली बाहेर पळालो .