शेखर जोशी मठातून बाहेर पडताना माझ्याच वयाच्या एका युवकाने मला हाक मारली "पंचम ओळखले नाही मला"मी शेखर, शेखर जोशी "शेखर जोशी माझा बाल मित्र ,कित्येक वर्षांनी तो मला आज भेटत होता ,शेखर आणि मी शाळेत एकाच वर्गात होतो ,शेखर माझा जीवश्च कंठश्च मित्र होता अभ्यासात मी आणि शेखर सतत पुढे असायचो ,कधी त्याचा पहिला नंबर तर कधी माझा ,अशी शर्यत असायची ,शेखर मध्ये बरेच कलागुणही होते ,चित्र काढणे रांगोळ्या काढणे ,किल्ले बनवणे ,दिवाळीला कंदील करणे ,गणपतीला आरास करणे इत्यादी उपक्रमात शेखर आमचा बिनीचा शिलेदार होता .त्याच्या मदतीने आम्हालाही पारितोषिके मिळायची , शेखर आम्हा दोनी भावांचा माझा आणि चैतुचा मित्र होता , एक वर्षी शेखर नेहमी प्रमाणे आमच्या मदतीला आला नव्हता म्हणून मी आणि चैतू दोघेही त्याच्या घरी भेटायला गेलो घरी बघितले तर घराला मोठे कुलूप होते,.शेखर कुठे आहे म्हणून आम्ही शेजारच्या खरे काकांच्या घरी गेलो पण त्यानाही ते माहित नव्हते दोन दिवसांनी खरे काका आमच्या घरी आले आणि त्यांनी आई बाबांना सांगितलेली एक दुखद बातमी आमच्या कानी आली कि रेल्वे प्रवासात शेखरच्या वडिलांचा मृत्यू झाला ,शेखरची आई आणि शेखर तिथे आपल्या मामा बरोबर तिथे गेले आणि आता शेखर आपल्या आई बरोबर त्याच्या अजोळीच राहणार आहेत त्याच्रआजोळ लांब कुठेतरी नागपूर जवळ होते , साधारण महिनाभराच्या अंतराने कळले कि वडिलांच्या अपघाती मृत्युच्या धक्क्याने त्याची आईही वारली आणि आता शेखर त्याच्या अजोळीच राहणार आहे , .आम्हाला मदत करणारा शेखर आता आमच्या गावात नाही आहे एवढाच त्याचा अर्थ आम्हाला कळत होता ,आमच्या साठी रोषणाई करणारा आमचा लाडक्या मित्राच्या आयुष्यात अंधारच झाला आहे हे मात्र आम्हाला समजण्याची जन झाली नव्हती काळाच्या ओघात आम्ही दोघेही भाऊ शेखरला जवळ जवळ विसरलोच होतो ,आज शेखर परत भेटल्या नंतर त्या आठवणीचा कडवसा समोर आला शेखर तू म्हणून शेखरला मी घट्ट निठी मारली एक दुखद स्वप्नातून जग आल्यासारखे मला वाटले ,आमच्या दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ,डोळे पुसतच आम्ही परत मठात शिरलो निस्तब्ध होतो दोघांनीही पादुकांवर डोके ठेवले मनोमन स्वामींचे आभार मानले ,समोरच्या प्रसादाच्या थाळीत एकाच पेढा होता गुरुजींनी तो शेखरच्या हातावर ठेवला ,,बाहेर आल्यावर शेखरने पेढ्याचे तीन तुकडे केले एक एक मला फीला एक स्वतः खाल्ला अंनि दुसरा माझ्या हातावर ठेवला ,हा कोणासाठी मी विचारले छोट्या चैतू साठी शेखर म्हणाला ,बालपणाच्या आठवणी परत उजळल्या होत्या ,चाल घरी चाल आता तुला कुठेही जाऊ देणार नाही मी ,बळे बळे ओढतच मी त्याला घरी घेऊन आलो ,घरी आल्यावर त्याची आणि आई बाबांची भेट झाली ,आईच्या प्रश्नाला हा शेखर जोशी म्हणून मी उत्तर देताच त्यांचीही प्रश्नाची सरबत्ती सुरु व्हायच्या आताच माजी आत आल्या आणि म्हणाल्या ग मुले भूकेजली दिसताहेत पहिल्यांदा त्या काही खायला दे आणि मग खाता खाता त्यांना बोलू दे, चलारे.हात हात पाय धुऊन या यात ,शेखरला घेऊन मी बेडरूम मध्ये गेलो .फ्रेश होऊन डायनिंग टेबला समोर बसलो , समोर गोड शिरा आणि भाजी ठेवली होती ,शिरयाच्या बशीतून एक चमचा तोंडात घातला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रुंचे लोट वाहू लागले हुंदके देऊन तो रडू लागला ,एक क्षण सगळेच गोंधळलो ,इतक्यात माजी पुढे झाल्या त्याच्या जवळ जाऊन त्यांनी त्याचे डोके थोपटले आणि आपल्या पदारानीशेखर त्याचे डोळे पुसले आणि म्हणाल्या रडू नकोस शेखर सावर स्वतःला , शेखर हळू हळू शांत झाला ,त्याच्या मनातले एकटेपणाचे दुक्ख ओसरले होते ,बशीतला शिरायचा चमचा त्याच्या तोंडात घालून माजी म्हणाल्या हा तुझ्या आईचा घास समाज. शेखरच्या चेहऱ्यावर कृत्कृत्यतेचे भाव साई सारखे जमले होते.आज कुठे जायचं नाही कळल का दोन दिवसांनी बघू आपण ,तुलातर काही अडचण नाही ना ,लाजवू नकोस आई शेखर म्हणाला ,
. सकाळी उठलो तेव्हा शेखर स्थिरावलेला दिसला .आपले पणाच्या प्रेमाने दुक्खाचे ढग पांगले होते शेखर च्या हातात एक सोनेरी पदक होते शेखर माजींच्या समोर आला आणि ते त्यांनी माजींच्या पायावर ठेवले," शोध संपला "शेखर म्हणाला कसला? लोकेत पायावरून काढून पुसून हातात घेत माजी म्हणाल्या "पायांचा ,पदके चिकार मिळाली पण पायाच नव्हते ठेवायला आता ते हि मिळाले" वेडा मुलगा ह्याची खरी जागा हि बघ, त्याच्या गळ्यात ते घालत माजी म्हणाल्या , भारतातल्या नामांकित विद्यापीठाने सर्व प्रथम आल्याबद्दल स्नातकाला दिलेले ते अभियांत्रिकी शाखेचे पदक होते , त्या पदकाच्या सुवर्ण स्पर्शाने माझेही सर्व प्रश्न सोडवले होते ,हॉस्पिटलच्या बांधकामाचे सर्व काम निर्धास्तपणे मी शेखारवर सोपवले ,रात्रन दिवस मेहनत घेऊन शेखरने खर्चाच्या अंदाज सहित ते पूर्ण केले ,दादा आणि वाहिनी यायला दोनच दिवस होते आणि माझे सर्व कामही तयार होते .प्रचीती आली होती स्वामींच्या साथीची, मी त्याच्यावर कितीही रागावो पण माझा लाडका स्वामी मात्र सदैव माझ्या पाठीशी उभा राहत होता ,आपल्या प्रेमाचे अदृश्य महावस्त्र माझ्यावर पांघरणारा माझा स्वामी माझ्याकडे बघूनमिश्कील पणे हसतो आहे असे वाटत होते .

शशांक रांगणेकर

.jpg)
No comments:
Post a Comment