Thursday, February 12, 2015

कालिंदीच्या तिरावर

कालिंदीच्या तिरावर


माझ्या प्रिय भक्ता आज मी स्वताहून तुला भेटायला आलो आहे,नेहमी मला हाक मारतोस ,मला दर्शन दे म्हणून अळावतोस ,"त्वं एव माता पिता त्वं एव त्वं एव बंधू सखा त्वं एव "म्हणून नाते बंधाच्या सर्व पैलूतून मला पाहतोस ,तू बांधलेले हे सर्व नाते बंध मला प्रिय आहेत ,समर्पणाची हि तुझी भावना मलाही मोहवते माझी मानस पूजा करताना सर्व षोडशोपचार तू पार पाडतोस,मला स्नान घालतोस ,भरवतोस नव विधा भक्तीने मला पुजतोस,त्या सुख सोहळ्याने तू माझ्या अधिकच जवळ येतो ,तुझ्या ह्या भक्ती पूर्ण उपासनेचा मी सर्वार्थाने उपभोग घेतो ,"हे माझे पूर्ण आयुष्यच तुझ्या पुढे नैवेद्य म्हणून ठेवलं आहे म्हणून सांगतोस तेव्हा तृप्तीचे तरंग उठतात , तुझे स्तोत्र मंत्र मला एकाच गोष्टीची आठवण करून देतात कि तू सर्स्वनाने माझा आहेस ,तुझ्या ह्या भक्तीचे आदि स्वरूप मला मोहवते ,आज तुझ्या त्या समर्पणाचे दिव्य स्वरूप पाहायला माझ्या बरोबर चल,तुझ्या माझ्यातल्या सर्वस्पर्शी नात्यातला एक दिव्या स्पर्शी सुखसोहळा अनुभवायला मी तुला कालिंदीच्या तीरावर घेऊन जातोय .

कालिंदीच्या तीरावर संथ वारावाहत होता ,काळाशार पाण्यावर एक छोटेसे वट पत्र वाहत येत होते ,त्या वटपत्रा वर  एक छोटेसे बाळ,पहुडले होते ,बाळ कृष्णाचे मनमोहक रूप पाहून माझे डोळे निवाले ,आपल्या पायाचा अंगठा चोखत असलेल्या त्या बाळाने मला हाक मारली ,मला कळेना मला कोण बोलावताय ,कोटी सूर्याचे तेज मुखावर धारण करणारे श्री कृष्णाचे ते बाळ रूप मला हाकारत होते ,मला पाहताच ते मला ते म्हणाले मला उचलना,त्याच्या आणि माझ्या मध्ये वाहणारी ती कालिंदीचे पात्र मी कसे काय पार करू शकत होतो ,मला काहीच कळेना ,माझ्या मानवी मर्यादा मला प्रकर्षाने जाणवल्या ,माझा परम सखा मला बोलवत होता पण हि कालिंदी त्याच्या आणि माझ्या मध्ये वैरिणी सारखी वाहत होती ,वैरीणी सारखी वाहणारी हि कालिंदी मी कशी काय पार करू ,एक मानवी असहायतेचा हुंकार माझ्या मनातून उमटला आपल्या गालावरच्या खळ्यात साऱ्या विश्वाची सुंदरता प्रगट करणारे ते बाळ मुकुंदाचे रूप खुदकन हसून म्हणाले तुला माझ्याकडे यायचे आहे ना मग कोण अडवणार तुला ,त्याच्या पायाच्या अंगठ्याच्या स्पर्शाने कालिंदीचे पाणी ओसरले ,विस्फारित मुद्रेने त्याच्या कडे पाहणाऱ्या मला पाहून ,ते मला म्हणाले येना मला उचल,त्या आनंद कंदाला,मी उचलले,त्याला छातीशी धरू मी त्याच्यावर मुक्यांचा वर्षाव केला ,आत्म्याच्या मिठीत परमात्मा सापडला होता ,आपल्या गोऱ्या तांबूस पावलांनी मला  ढूश्या मारत ते परमेश्वराचे बाळ रूप केविलवाण्या स्वरात मला म्हणाले "मला भूक लागली आहे ,मला दुध हवाय .द्रौपदीच्या ओटीत  अन्नपूर्णेची अक्षय थाळी घालणारा माझा परम सखा भूकेजला होता आणि माझ्या थाळीत मात्र एक तुळशी पत्र हि नव्हते.एक असाहयता मनाला कापत गेली ,छकुल्या,काय देऊ मी तुला ,आज खरोखरच तुला द्यायला माझ्या कडे काहीही नाही ,एक धीर गंभीर आकाशवाणी झाली ,तुझ्या कडे सर्व काही आहे तुझे आयुष्याच तू माझ्या पुढे नैवेद्य म्हणून ठेवले आहेसना,तुझी भक्तीच आज माझी भूक भागवणार आहे "बघ त्या भक्तीला वात्सल्याचा कसा पान्हा फुटलाय ,खरोखर तसच झाले होते ,त्या पान्ह्यात माझे नश्वर शरीर वाहून गेले होते ,राहिला होता फक्त आत्मा ,आत्म्याला एका मातृ रूपाने सामाऊन घेतले होते ,त्या मातृत्वाने छोट्या बाल कृष्णाला उचलून घेतले ,बाळाचे ओठ ममतेच्या दुघ्ध कुम्भातले दुध चुरूचुरू पिऊ लागले ,हिमालयातून वाहणाऱ्या गंगा यमुने सारखा ममतेचा पान्हा वाहत होता इदं न मम म्हणत आत्मा परम सुखाच्या तरंगावर तरंगत तरंगत होता ,फक्त बाळकृष्णाच्या पावलाच्या ढूश्या भासत होत्या ,नैवेद्याचा प्रसाद झाला होता

तृप्त होऊन बाळ शांत झोपले होते ,आत्म्याला वात्सल्याचा मोहर येऊन मन सुखावले दरवाजावरच्या आवाजाने डोळे उघडले ,दारात पंचम उभा होता ,धापा टाकतच आत आला "बंधू मला भूक लागली आहे ,काहीतरी खायला द्या ,समोरच्या टेबलावर एक लाडू ठेवला होता तोच त्याला दिला ,भूकाजलेल्या पंचमने तोंडात घातला,त्या लाडवाची चव वेगळीच होती ,आपणच सर्व लाडू खाल्याचे पंचम च्या लक्षात आले .ओठाला लागलेला एक छोटासा दाणा त्यांनी माझ्या तोंडात टाकला ,मी तो खातच तो म्हणाला sorry बंधू मी तुमचा उपवास तोडला,माझे उष्टे दिले मी,आज गुरुवारचा उपवास तुमचा ,"वेड्या प्रसादाला कधी उष्ट म्हणतात का ,माझ्या उपवासाचे पारणे फिटले,एक हसू त्याच्या चेहऱ्यावर उमटले दुध पिणारा बाळ कृष्ण पंचम च्या चेहऱ्या अडून मला बोलवत होता
क्रमशः
शशांक रांगणेकर


No comments:

Post a Comment