Friday, March 27, 2015
Monday, March 23, 2015
मनोगत
मनोगत
स्वामी समर्थ हे माझे लाडके दैवत . अगदी "माझा स्वामी "म्हणण्या इतके . मी त्याची फार उपासना करतो पूजा अर्चा करतो अशातली गोष्ट नाही ,पण तो सदैव माझ्या बरोबर आहे हि अनुभूती मात्र कायमची मनात तेवत असते . तो माझा कोण आणि मी त्याचा कोण ?ह्या प्रश्नाचे नेमके उत्तर माहित नसूनही तो माझा इतका जवळचा आहे तेवढ्या जवळचे कोणीच नाही हि जाणीव मात्र मनात कायमची उमलत असते .त्याच्या आणि माझ्या नात्याला नाव नाही कारण एखाद्या नात्याला नावाचे लेबल चिकटले कि त्याच्या मर्यादा अधोरेखांकित होतात .अगदी आई बाप काका मामा मित्र गुरु सुद्धा ,पण इथे मात्र तसे नाही काही नाती एवढी व्यापक असतात कि बळीच्या अवतारा सारखी तिन्ही लोक व्यापूनही दशांगुळे अव्याप्त राहणारी . जेव्ह्या नात्याचे स्वरूप एवढे अमर्याद असते तेव्हा त्याला अमरत्वाची तेजस्वितता येते .
"तुळशीपत्र 'हि अशीच कहाणी आहे जन्म आणि मृत्युच्या सीमा रेषा पार करणारी आणि स्वामींच्या इच्छेने गत जन्माची खुण सांगत पुनर्जन्म घेणारी . हि कथा हे त्यागाचे ,पावित्र्याचे ,आणि निरलस प्रेमाचे प्रसादचिन्ह आआःए. आवड ,प्रेम भक्ती ह्या एकाच भावनेच्या चढत्या कमानी आहेत .
नात्याच्या सर्व लौकिक अर्थाना पार करून पुढे जाणारे नाते मग ते माणसाचे माणसाशी असो अथवा परमेश्वरा शी असो ते एका अत्त्युच्या पातळीवर पोहचते ,ह्या कथेतील तीन मुख्य पत्रे "बंधू पंचम आणि स्वामी ह्यांच्या अनुपम नात्याची हि कहाणी आहे ,ह्या नात्याला काय म्हणावे सगळेच अगम्य आणि अतर्क्य ,"मै गया नाही अभीभी जिंदा हु "असे सांगणाऱ्या स्वामींच्या अमरत्वाची प्रचीती देणारी एक अमर प्रेम कहाणी ."ह्या अलौकिक त्रिकोणात वर्तमान भूत आणि भविष्य सारे काही बंदिस्त आहे कारण ह्या सर्वांचा एकमेव स्वामीही तोच आहे
"श्री स्वामी समर्थ "

शशांक रांगणेकर
Tuesday, March 3, 2015
पुनरागमन
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी माझा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला .सत्काराच्या वेळी दादांचा फोन आला कि मला मुलगा झाला आहे. शेखर खुणा करून मला हि बातमी कळवत होता .सत्कार समारंभ संपवून आम्ही हॉटेल वर गेलो .दादांनी फोन वरून सांगितले कि बाळ आणि मंजुषा सुखरूप आहेत आणी झोपली आहेत, आदि मात्र झोपला नव्हता ,बोबड्या भाषेत म्हणाला "काका आपल्या कडे बाल आला आहे ,लवकर बघायला ये "."उद्याच येतो "मी म्हणालो ,इथली काळजी करू नकात ,बाळ बाळांतीण दोघेही सुखरूप आहेत ,वाहिनी म्हणाल्या ,सत्काराचा कार्यक्रम सर्वांनी दूर दर्शन वर बघितला होता .
"पंचम झोपूया आता "शेखर म्हणाला फ्लाईट पहाटेची असल्याने आम्ही झोपलो ,थकल्याने बिछान्यावर पडतापडताच झोप लागली . डोळे आसवानी भरून आले होते सुखाच्या राशीवर असूनही मी दुखखी होतो ."स्वामी सगळे दिलेस पण हे बघायला माझे बंधू कुठे आहेत ,त्यांचा तो प्रेमळ स्पर्श मला आज पाहिजे होता
त्या वाचून मी भिकारी आहे रे "डोळे पाझरत होते आणि मनही हलकेच झोप लागली ,पाहटे पहाटे स्वामींच्याच
शब्दांनी जाग आली "तू जिथे तिथे तो आणि मीही उद्याच तुला आमच्या शब्दांची प्रचीती येइल. "
सकाळी विमानात बसलो ,मन घराकडे घिरट्या मारत होते ,विमानतळावर दादा आणि आदी आले होते ,"काका बाल आला आहे पण तो सारखा रडतोय आमच्याशी खेळत नाही तो आजीने त्याला बांधून ठेवले आहे "अस का ?आपण सोडवूया त्याला मग आपण खेळूया मी म्हणालो .गाडी हॉस्पिटलच्या आवारात शिरली ,मी उतरताच टायगर ने भुंकून मला स्वामी आणि बंधूंच्या फोटो समोर थांबवले ,तिथे डोके ठेऊन मी आत गेलो.
आई ,माजी , वाहिनी मंजुशाच्या रूम मध्ये होत्या बाळ रडण्याचा आवाज येत होता ,मंजुशाच्या चेहऱ्यावर सुखाची साय दाटली होति. घे बाबा बाळाला माजी म्हणाल्या आणि बाळाला अलगद उचलून त्यांनी माझ्या हातात दिले ,मी आनंदाने बाळाला कवटाळले ,"स्वामी समर्थ "मन हुंकारले "मानत विचार आला आज तुम्ही असायला हवे होतात बन्धु. बाळा नि इतक्यात माझ्या अंगावर सुसु केली ,,आईने दुपटे सोडवले ,आणि आई आणि माजी बाळाला पुसू लागल्या, माजींचे लक्ष बाळाच्या छातीकडे गेले त्याच्या छातीवर एक सुस्पष्ट कुणालाही कळेल अ शी तुळशी पत्राची जन्म खूण होति.
"बंधू माझ्यासाठी परत आलात ना "मनात विचार उमटले नकळत स्वामींच्या फोटो कडे लक्ष्य गेले माझा स्वामी माझ्या कडे बघून मिश्किलपणे हसत होता फ़ोटोच्या गळ्यातले बिल्व पत्राचे त्रिदल एका वेगळ्या आणि अपूर्व तेजाने नाहून निघाले होते ,बंधूचा पारिजात फुलांनी बहरला होता .
बंधू तुम्ही माझे कोण ?मनात प्रश्न आला , मला माहित नाही स्वामींना विचार , मलाही माहित नाही उत्तर आले पण आकाशातून . श्री स्वामी समर्थ'
शशांक रांगणेकर
९८२१४५८६०२
सोहळा
सोहळा
मंजुषा च्या वडिलांची घरच्या नि घेतली आणि आमचे लग्न रीतसर ठरले ,आई आणि माजीनी शेखरचे हि लग्न ठरवले ,दोन्ही विवाह सोहळे एकाच दिवशी संपन्न झाले ,दादांना पाया पडताना दादांनी मला मिठी मारली ,तुम्हाला आशीर्वाद देतो कि दिन दुबळया च्या सेवेत तुमचे आयुष्य संपन्न होऊ दे ,तुमचे बंधू तिथेच तुम्हाला भेटतील .दादा म्हणाले" बंधूंच्या आठवणीने मन परत पाझरले डोळ्यातून अश्रू वाहायला लागले .
आयुष्यात सुख ओसंडून जात होते ,रुग्णसेवे पुढे मला आणि मंजुषा ला वेळ कमी पडत असे ,मंजुषा कधीही तक्रार करत नव्हती ,वाहिनी सारखे तीनीही रुग्ण सेवेला बांधून घेतले होते .
मंजुषा गरोदर असल्याची बातमी तिनी मला सांगितली वहिनीनी तपासणी करून त्यावर शिक्का मोर्तब केले. घरात सगळ्यांनाच आनद झाला आई ,माजी ,आणि वाहिनी ह्या तीन देवियांच्या निगराणी खाली मंजुषा चे कोड कौतुक होत होते. आनंदाचा क्षण जवळ येत होता .
एक दिवस राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागातून फोन आला बंधू रुग्णालयाच्या अपूर्व कामगिरी साठी केंद्र सरकार तर्फे माझा सत्कार होणार होता राष्ट्रपती भवनात हा सोहळा संपन्न होणार होता ,
शहरात हि बातमी कळली आणि बंधूवर लोकांची रीघ लागली ,हॉस्पिटलच्या सहकार्यांच्या उत्साहाला उधाण आले होते .त्यनि सर्वत्र रोषणाई केली होती ,सतत स्वामी धून वाजत होति. दादांनी मला स्वामी आणि बंधूंच्या फोटो पुढे नेले माझ्या डोक्या वरून हात फिरवला माझ्या मस्तकाचे अवघ्राण करून ते म्हणाले "बंधू बघितला का हा आपला पंचम केवढा मोठा झालाय तो ,आगदी आभाळा येवढा त्याला आशीर्वाद द्या कि त्याच्या आभाळ मायेचे पांघरूण अनेक दिन दुबळ्यांना लाभू द्या .स्वमि कृपा त्याला सदैव साथ करू द्या .दादांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू माझ्या डोळ्यातून पाझरणाऱ्या अश्रूत कधी सामावले ते कळले पण नाही .
दुसर्याच दिवशी दिल्लीला निघायचे होते ,मंजुषा चे दिवस भरत आले होते ,मी आणि शेखर दिल्लीला निघालो ,मंजुषाला अश्या अवस्थेत सोडून जाताना माझ्या मनात काळजी डोकावत होती ,'माझ्या चेहऱ्या वरची काळजी पाहून मंजुषा म्हणाली तुम्ही काळजी करू नकात स्वामी आहेत माझ्या बरोबर ". मनावरचा मोठा बोझा उतरला आणि काळजी
स्वामींच्या पायाशी सोडून मी आणि शेखर दिल्लीला निघालो
मंजुषा च्या वडिलांची घरच्या नि घेतली आणि आमचे लग्न रीतसर ठरले ,आई आणि माजीनी शेखरचे हि लग्न ठरवले ,दोन्ही विवाह सोहळे एकाच दिवशी संपन्न झाले ,दादांना पाया पडताना दादांनी मला मिठी मारली ,तुम्हाला आशीर्वाद देतो कि दिन दुबळया च्या सेवेत तुमचे आयुष्य संपन्न होऊ दे ,तुमचे बंधू तिथेच तुम्हाला भेटतील .दादा म्हणाले" बंधूंच्या आठवणीने मन परत पाझरले डोळ्यातून अश्रू वाहायला लागले .
आयुष्यात सुख ओसंडून जात होते ,रुग्णसेवे पुढे मला आणि मंजुषा ला वेळ कमी पडत असे ,मंजुषा कधीही तक्रार करत नव्हती ,वाहिनी सारखे तीनीही रुग्ण सेवेला बांधून घेतले होते .
मंजुषा गरोदर असल्याची बातमी तिनी मला सांगितली वहिनीनी तपासणी करून त्यावर शिक्का मोर्तब केले. घरात सगळ्यांनाच आनद झाला आई ,माजी ,आणि वाहिनी ह्या तीन देवियांच्या निगराणी खाली मंजुषा चे कोड कौतुक होत होते. आनंदाचा क्षण जवळ येत होता .
एक दिवस राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागातून फोन आला बंधू रुग्णालयाच्या अपूर्व कामगिरी साठी केंद्र सरकार तर्फे माझा सत्कार होणार होता राष्ट्रपती भवनात हा सोहळा संपन्न होणार होता ,
शहरात हि बातमी कळली आणि बंधूवर लोकांची रीघ लागली ,हॉस्पिटलच्या सहकार्यांच्या उत्साहाला उधाण आले होते .त्यनि सर्वत्र रोषणाई केली होती ,सतत स्वामी धून वाजत होति. दादांनी मला स्वामी आणि बंधूंच्या फोटो पुढे नेले माझ्या डोक्या वरून हात फिरवला माझ्या मस्तकाचे अवघ्राण करून ते म्हणाले "बंधू बघितला का हा आपला पंचम केवढा मोठा झालाय तो ,आगदी आभाळा येवढा त्याला आशीर्वाद द्या कि त्याच्या आभाळ मायेचे पांघरूण अनेक दिन दुबळ्यांना लाभू द्या .स्वमि कृपा त्याला सदैव साथ करू द्या .दादांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू माझ्या डोळ्यातून पाझरणाऱ्या अश्रूत कधी सामावले ते कळले पण नाही .
दुसर्याच दिवशी दिल्लीला निघायचे होते ,मंजुषा चे दिवस भरत आले होते ,मी आणि शेखर दिल्लीला निघालो ,मंजुषाला अश्या अवस्थेत सोडून जाताना माझ्या मनात काळजी डोकावत होती ,'माझ्या चेहऱ्या वरची काळजी पाहून मंजुषा म्हणाली तुम्ही काळजी करू नकात स्वामी आहेत माझ्या बरोबर ". मनावरचा मोठा बोझा उतरला आणि काळजी स्वामींच्या पायाशी सोडून मी आणि शेखर दिल्लीला निघालो
Wednesday, February 25, 2015
प्रचीती

काळ कधीही कुणासाठी थांबत नाही,थांबतात त्या आठवणी
हॉस्पिटल व्यवस्तीत चालले होते. वाहिनी आणि मी सर्वत्र लक्ष्य ठेवून होतो. दादांचेही लक्ष्य हॉस्पिटल वर होते. आई आणि माजी दररोज ,प्रसूती कक्षा कडे फेरी मारायच्या.एखाद्या घाबरलेल्या पहलटकारणीच्या पाठीवरून हात फिरवून तिला धीर द्यायच्या,त्यांच्या आवडी निवडी कडे जातीने लक्ष द्यायच्या जेवणाच्या वेळी स्वतः थांबून वेळ प्रसंगी त्यांना भरवायच्याही . मी आणि दादा त्यांची थट्टा करायचो त्यांनी खास बनवलेला शिरा आम्हालाही हवा आहे म्हणून हट्ट धरायचो,आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या स्त्रिया आणि साधन वर्गातल्या स्त्रिया ह्यांच्यात हॉस्पिटल मध्ये कधीही भेदभाव केला होऊ नये म्हणून सतत सतर्क राहत.
बंधू दिन दुबळ्यासाठी मोठा आधार होता. कुंतलने दिलेल्या बंगल्याचे मुलींसाठी निशुल्क वसती गृह करण्याचे ठरले. ह्या दोन्ही संस्थाना जनता जनार्दनाने भरघोस पाठींबा दिला स्वामीच जणू ह्या संस्थांचे चालक झाले होते, त्यांच्या आशीर्वादाची प्रचीती आपले आस्तित्व दाखवत होते. त्यांच्या कृपेने बंधूला काहीही कमी पडत नव्हते,देश परदेशातून मदतीचा ओघ वाहत होता ,बरचसे परदेशी रुग्णही बंधुमधून उपचार घेत होते.बंधू परदेशातही प्रसिद्ध झाले. अनेक सेवाभावी संस्थानि ,मान्यवरांनी बंधूलानावाजले, सन्मानित केले.
आदित्य दादांचा मुलगा माझ्याकडे फारच अट्याचड होता दिवसातू "प काकांनी "एकदातरी उचलल्या शिवाय गुलामऐकायाचा नाही ,दादा वाहिनि पेक्षा "पकाका"अधिक जवळ वाटायचा.तक्रारीच्या सुरात दादा म्हणाले"कुठल्या जन्माची दुष्मनी काढताहेत पंचम "बंधूननाही चोरलेत आणी आतातरआमच्या आदिलाही "आणि तुम्हाला स्वतःला तरी सोडलाय का मोकळे?दिवसातून दहा वेळा विचारता पंचम जेवला,का त्यांनी काही खाल्ले का?दहावेळा प्रश्न विचारून मला हैराण करता पंचम लहान का आहे एवढी करायला ?
सारखे प्रश्न विचारात असता हैराण होते मी तुमच्या प्रश्नांनी ,आता लहान का आहे तो आणि तुमच्या साठी मोठा कशी व्हायचा तो ?आता लग्नच करते त्याचे आणि मग छोटा पंचम आला कि मग मोठा वाटेल तुम्हाला तो" माजी म्हणाल्या "इतक्यात तरी नको माझ्या दादाचा लहान भाऊ म्हणून लाड पुरवून घेऊ द्यात मला मी म्हणालो" तू राहशील पण मी बरी राहू देशील मला तुझे आणि शेखरचे लग्न लवकरात लवकर करायचे आहे होना? आई कडे पाहून माजी म्हणाल्या ,"हो तर आगदी लगेच मुलगी बघायला सुरवात करूयाच आपण "आई दुजोरा देत म्हणाली . "पंचम साठी मुलगी बघायला हवी आता , काहीही नको वहिनी,माझ्या ह्या दोन्ही सास्वांचे श्रम वाचावे म्हणून माझ्या लाडक्या भावजीनने त्यांचे कामं हलके केले आहे ,मुलगी त्यांनीच पसंत केली आहे वहिनी म्हणाल्या, कोण ग ?कायरे पंचम नाव सांग ना ?मला नाही माहित वहिनीनच विचार ?ह्याला त्याला कशाला भावजी डॉक्टर मंजुषाला विचारुया ?चालेल न भावजी , चालेल का ? धावेलाही वहिनीसाहेब "मी म्हणालो आणि आदी आणि टायगर घेऊन खोली बाहेर पळालो .
Thursday, February 19, 2015
.बंधू
हॉस्पिटल च्या मुहूर्ताचा दिवस आला ,शेखरने फार सुंदर पद्धतीने बांधले होते .आवरारात शिरतानाच कुठूनही दिसावी अशी स्वामींची भाव मूर्ती आणि तिच्या मागे लावलेला "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे "असे आश्वासन देणारा एक शीला लेख अतिशय आश्वासक पद्धतीने लावला होता,दर्शनी भागात सर्व धर्म प्रार्थना स्थळ होते ,बंधूंचा एक भव्य दगडात कोरलेला पुतळा ,अन्नपूर्णा ,हे स्वयंपाक घर लहान मुलांच्या कक्षाचे नाव होते ममता.अत्यंत कल्पक पद्धतीने होस्पिटल बनवले होते.माझे भव्य केबिन ,वहिनींचे भव्य केबिन अतिशय कल्पकतेने बनविले होते ,
शुभारंभाच्या दिवशी सर्व शहर लोटले होते माधवराव जी माजी दादा आई बाबा सारे जण व्यवस्था बघत होते शेखरचे सर्वजण कौतुक करत होते अवघडलेली वहिनी नको नको म्हणत असतानाही काम करत होती,स्वामी समर्थ नावाची रामधून चालू होती,सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडत होते,,एक फोन खणाणला माजींच्याकडे कोणाला तरी बोलायचे होते.मी बोलतोय मला तुम्हाला भेटायचे आहे येऊ का ,"भावजी तुम्ही किती वर्षांनी तुमचा आवाज ऐकतेय ,जरूर या भावजी पण घरी नाही इथे मी युवराज सर्व हॉस्पिटल मधेच आहोत ,आलोच वहिनी ,थोड्याच वेळात रावसाहेब आणि एक व्यक्ती गाडीतून उतरले.मला आश्चर्याचा धक्काच बसला त्यांच्या बरोबर कुंतल मादाम उतरल्या ,रावसाहेबांनी सर्व हॉस्पिटल पहिले विनाशुल्क हॉस्पिटल मधले सुसज्ज ऑपेरेशन थेटर पाहून ते खुश झाले.माजीना पाहून म्हणाले वहिनी माझ्या मित्राचे नाव तुम्ही रोषन केले आहेत ,धन्य आहे तुमची आणि युवराजांची ,फक्त युवराजांची नव्हे भावजी ह्या माझ्या तीनीही मुलांची ,माजीने अम्हका तिघानाही बोलावले आणि आमची ओळख राव साहेबाशी करून दिली.युवराजांना तुम्ही ओळखताच ,हा माझा दुसरा मुलगा डॉक्टर पंचम ,आणि हा शेखर ,ज्यांनी हे हॉस्पिटल बांधले,वहिनी बंधूंना अमर केलाय तुम्ही आणि तुमच्या ह्या त्रिमूर्तीने ,आम्हा तिघानाही जवळ बोलवून आमच्या डोक्यावरून हात फिरवून त्यांनी आशीर्वाद दिले ,कुंतल मदमाने वाहिनीन बरोबर फिरून पूर्ण वास्तू बघितली पसंतीची छटा त्यांच्या
चेहऱ्यावर उमटली होती ,माझ्या केबिन मध्ये त्या आल्या ,माझ्या पाठीवर पसंतीची थाप त्यांनी मारली आणि एक बंद लिफाफा कोणाच्याही नकळत माझ्या हातात दिला .रावसाहेब आणि कुंतल सर्वाना भेटून परत निघाल्या.
कार्यक्रम पूर्ण झाल्यावर घरी गेलो ,लिफाफा फोडला त्यात एक चिट्ठी होती "पंचम आयुष्यात मला नर खूप मिळाले पण पुरुष मात्र एकाच मिळाला ,ज्यांनी माझ्या अंगावर गुरु शिष्याच्या नात्याच्या मजबूत धाग्यात विणलेले महावस्त्र पांघरले ,त्या महावास्त्राची उब कायमची पुरेशी आहे,बाबांच्या सांगण्यावरून मी घर हॉस्पिटल साठी दिले आहेत कारण आता नि कायमची इथेच राहणार आहे,काहीच दिवसात इनामदार वकील तुला भेटतील,तूअनमान करणार नाहीस ...कुंतल.

न कळत हात स्वामींच्या पुढे जोडले गेले बंधूंचे शब्द आठवले तारण तलावाच्या चुल्भर पाण्यात तुम्ही बुडणार नाहीत ह्याची खात्री आहे आम्हाला,घसरलो होतो पण तुळशीपत्राने सावरलं होते,थकून गेल्याने झोप लागली ,पहाटेच जाग आली टायगर भुंकण्याने टायगर आत आला आणि मला पराजात्काच्या झाडाकडे घेऊन गेला पारिजातक पुन्हा अवेळी फुलाला होता.
दुसर्या दिवशी सकाळी ,हॉस्पिटल मध्ये मी आणि वाहिनी गेलो ,सर्व जुनियर डॉक्टर आणि स्टाफ opd मध्ये आले सर्वाना मी आणि वहिनीनी काम समजून सांगितले ,वाहिनी रुग्णांना बघत होत्या इतक्यात त्यांना पोटात दुखायला लागले .घरी फोन करून सांगून मी मेट्रन आणि लेडी डॉक्टर च्या मदतीने लाबोर रूम मध्ये नेले , वाहिनी म्हणाल्या पंचम काळजी करू नकोस डिलिवरी नॉर्मल होईल ,काही लागलेच तर मेत्रोन तुला आत बोलावतील,बेस्ट ऑफ लक वाहिनी. लेडी डॉक्टर ने दरवाजा बंद केला ,एवढ्यात आई माजी बाबा दादा सर्व जन आले दादा थोडेसे नर्वस वाटत होते ,फार दुखतंय का तिला दादा मला म्हणाले ,त्याला काय विचारताय युवराज ह्या कला किती भयंकर तरीही सुखद असतात हे त्याला काय कळायचे ते काळात फक्त एका आईलाच ,५ मिनटात दरवाजे उघडून मेट्रन आणि डॉक्टर बाहेर आल्या अभिनंदन माजी तुम्ही आजी झालात ,अभिनंदन युवराज तुम्ही बाबा झाले आहात ,अभिनंदन डॉक्टर पंचम आपल्या हॉस्पिटल मध्ये झालेला पहिला जन्म आहे, , डॉक्टर पंचम प्रोतोकॅल प्रमाणे आपण प्रथम आत जाऊन बाळआला चेच्क करून मग इतरांना पाठवावे मेट्रन म्हणाल्या,दादांना चिडवत मी प्रथम आत गेलो वाहिनीन बाळाला तपासले आणि मग सर्वाना आत सोडले दादा आई माजी सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दाटला होता ,बाळ चांगले गुटगुटीत होते ,हॉस्पिटल चे सर्व सहकारी मला अभिनंदन करायला जमले सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता,टायगर हि त्या आनंदात सामील झाला होता ,त्यालाही जणू बाळाला आणि वाहिनीन बघायचे होते ,वाह्निनी आतूनच आवाज दिला टायगर मी बरी आहे आणि बाळही ,जणू कळल्या सारखे करून तो आनंदाने भुंकला,थोड्या वेळाने माझ्या आणि दादाच्या कपड्यांना पकडून ओढू लागला ,काय झाले मी विचारले भुंकत भुंकत आम्हाला ओढून तो दर्शनी भागात घेऊन आला ,आणि स्वामी आणि बंधूंच्या फोटोसमोर उभा राहिला जणू त्यांना प्रणाम करायलाच तो सांगत होता,आमचे दोघांचेही डोळे पाणावले दादांनी मला घट्ट मिठी मारली आणि म्हणाले आजचा दिवस पाहायला बंधू शरीराने नाहीत पण मानाने इथेच आहेत.आपल्या सर्वांच्या जवळ.माझे हि मन भरून आले होते त्यांच्या आठवणीने डोळे पाणावले माझे दुक्ख दादांच्या मिठीत मी मोकळे केले,.
हॉस्पिटल आणि अभ्यासाच्या व्यापा पुढे मला कुठेही बघायला वेळ मिळत नव्हता ,राज्य सरकारने आणि अनेक सेवाभावी संस्थांनी
हॉस्पिटल च्या कार्याची दाखल घेतली ,आजू बाजूंच्या पंचक्रोशीत "बंधू"हे नाव आदराने उच्चारले जात होते ,माजी आणि आई जातीने हॉस्पिटल च्या अन्न पूर्णे कडे लक्ष घालत होत्या ,,सर्व काही आल बेल होते ,पण मन सदैव स्वामी वचनाची आठवण करून द्यायचे ,तू मी आणि बंधू कधीही दूर होणार नाहीत,मग मला ते नसल्याची आठवण का छळते येणारा माणूस जाणार हे माहित असूनही मी ते नाही आहेत आणि कधीही मला परत भेटणार नाहीत हे समजू का शकत नाही ,स्वामिनी सांगितलेल्या वचनाचा अर्थ काय का ते एक स्वप्नाच होते ,काहीच कळत नव्हते , नव्हते ,दिवसभराच्या थकव्याने झोप आली ,पाहते पहाटे एक तेजाचा पुंज खोलीत पसरला साक्षात स्वामी उभे दिसत होते ,तू मी आणि बंधू हे एक त्रिदल आहे एकमेकांपासून कधीही दूर न होणारे ,आमच्या ह्या वचनाची खात्री तुला लवकरच पटेल , तुमचे एकमेकांचे नाते कालातीत आहे आणि तसीच तुमची माझ्यावरची भक्ती प्रेम आणि भक्ती ह्या अडीच अक्षरी अद्वैताचा एक जिवंत साक्षात्कार तुला होईल हे आमचे वाचन आहे तू आणि बंधूंचे नाते मृत्यू संपवू शकणार नाही ते निरंतर अबाधित राहील त्याला सदैव आमचा आशीर्वाद राहील ,शांत झोप तुला दिलेले कार्य करत राहा .त्या अशीर्वाचानाने शांत झोप लागली ,सकाळी उठलो आणि बंधूंच्या फोटो समोर उभा राहिलो .त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू पाझरत होते ज्याच्या स्पर्श केवळ माझ्यासाठीच होता.

[1]क्रमशः
Subscribe to:
Posts (Atom)
.jpg)
.jpg)

.jpg)

.jpg)