उद्विग्न मनाने पंचमला चल चालतो रे म्हणून मी निघालो. पंचम, स्वामी आणि बंधूंचा हा त्रिकोण इतका बांधीव झाला होता कि मला त्यात कुठूनच प्रवेश नव्हता.याबद्द्दल. बंधूंना भेटून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करावा अस मला वाटलं. म्हणून बंधूंना मी फोन केला. त्यंना सांगितलं कि मला त्यांना भेटायचं आहे. जरूर जरूर कविराज, बंधू म्हणले. कुठे भेटूया...? पंचम च्या घरी का..? नाही, त्याच्या अनुपस्थितीत मला तुम्हाला भेटायचे आहे. तुमच्या ऑफीस मधे भेटूयात का.? ओके सर, बंधू म्हणाले. बरोबर सहावाजता या. संध्याकाळी सहावाजता मी बंधूंकडे गेलो. केबिन वर knock करून मी आतमध्ये गेलो. या या कविराज अस प्रसन्नपणे हसून बंधूंनी माझे स्वागत केले काय घेणार चहा कि कॉफ़ि ..? काहीही नाही मला लवकर निघायचं आहे. अस कस चालेल?. प्रथमच येताय तुम्ही काहीतरी तुम्हाला घ्यावच लागेल. अस म्हणून दोन कॉफी आण म्हणून ओर्डर दिली. बोला कविराज काय विचरायचं तुम्हाला. काय विचारावे, सुरुवात कशी करावी हेच कळेना. चला तुम्हाला आम्ही धर्मसंकटात पाडत नाही. आमच्या पंचम चे तुम्ही लाडके मित्र आहात. तुम्ही आम्हाला आमच्या आणि पंचम च्या संबंधाबद्दल जाब विचारायला आला आहात. खरे म्हणाल तर मी किंवा पंचम दोन सज्ञान नागरिक आहोत. आमचे वैयक्तिक संबंध हा कोण्या अन्यव्यक्तीच्या चर्चेचा प्रश्नच होऊ शकत नाही. तरीही आम्ही तुमचा अधिकार मानतो. आजपर्यंत तुम्ही पंचम ला भारावलेल्या दहीपोह्यांचे ऋण आम्ही जरूर जाणतो. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला आम्ही नुसतेच तयार नाही तर बंधीलाही आहोत. फक्त आमच्या एकाच प्रश्नाचे तुम्ही उत्तर द्याव. फाशीची सजा झालेल्या गुन्हेगारालाही त्याच्या गुन्ह्याची ओळख करून द्यावी लागते. कोणत्या गुन्ह्यासाठी जो आम्हाला माहीतही नाही प्रत्येकाची नजर आमच्यावर एकेक खिळा ठोकते आहे. दोन माणसातील जिव्हाळा, तिसरयाला आक्षेपार्ह का वाटावा.? कारण काय? ते दोघे लौकिक अर्थाने एकमेकांचे कोणीही नाही म्हणून? त्यांच्या नात्याला कुठलेही लेबल लागत नाही म्हणून? कि त्या दोघांच्या वयात अंतर आहे म्हणून? कारण काय कविराज? सभ्यतेच्या कोणत्याही प्रस्थापित सीमारेखांना न उल्लान्घता फक्त स्वामी निष्ठेच्या श्वासावर या पवित्र ब्र्ह्मकामालात आक्षेपार्ह्य अस आहे तरी काय? पंचम आमचा कोण लागतो किंवा आमी एकेमेकच्या इतके जवळ का आलो आहोत. आमचे एकमेकांशी काय नाते आहे. हे प्रश्न आमच्यापुढे नाहीच आहेत.स्वामींनीच आम्हाला एकत्र आणले आहे आणि त्यांच्यावरची निष्ठा हा एकमेव आधार आहे.कविराज आमच्या दोघांच्या मनात एकाच दैवतावरची भक्ती फुललेली आहे. हे वयातल अन्तर आम्हाला कधीही बोज वाटत नाही. उलट पितापुत्राच्या वात्सल्याचा एक शेलाच वाटतो.एकवीस वर्षाचा युवक आमच्या नजरेत एक निर्वाज्य बालकच भासतो . रागावणारा, रुसणारा, आपले लाड पुरवून घेणारा, श्रीकृष्णाच्या सर्व रुपात बाल कृष्ण हे सर्वात मनमोहक रूप आहे. कविराज प्रेम, सत्य आणि परमेश्वर अनेक रुपात भेटतात. वाळूच्या रस्त्यावरून चालताना आपल्याच पायाच्या खुणान्नी ठसे उमटतात आणि त्यात पाणी भरल्या निसणारे चंद्राचे प्रतिबिंब हाच तुमचा चंद्र असतो. कारण त्याच्या चांदण्याला तुमच्या अस्तित्त्वाच गंध असतो. आकाशातल्या चंद्राशी आपल काय देणे घेणे . फक्त फरक असतो बघण्याचा. आमच्यासमोर जेव्हा पंचम येतात तेव्हा तो बाळकृष्ण म्हणूनच येतात. सगळच विसरतो आम्ही. डोळ्यांसमोर गोकुळ उभ करतात ते. भक्ताला पाहिजे त्यां रुपात परमेश्वर दर्शन देतो म्हणतात. म्हणून तर प्रत्येकाचा विठोबा वेगळा असतो. आमचे स्वामीच त्याच्या रुपात आम्हाला भेटतात.त्यांना जी सेवा आमच्याकडून करून घ्यायची आहे ते सर्व लाड ते आमच्याकडून करून घेतात. त्यांच्या इच्छेनेच त्यांनी हा प्रेषित आमच्याकडे पाठविला आहे आणि त्याचे लाड करण, बाल रुपाकडे पाहन हि आमचीच नव्हे तर स्वामींचीही इच्छा दिसते. ज्या आमच्या दैवताला हाक मारून आम्ही थकलो. तो जर या रुपात आम्हाला भेटायला आला तर या रुपाला नाकारण्याचे करंटेपण आम्ही कसे करू शकतो.
बंधू, ज्याला तुम्ही परमेश्वराचे रूप मानता. तो एक सर्वसामान्य माणूस आहे. माझ्या सारखाच एक तरुण आहे. सिगारेट ओढणारा. कधीकधी दारू पिणारा. समवयस्क मित्रांबरोबर आणि मैत्रिणींबरोबर रमणारा. हा तरुण तुम्ही जेव्हा बघाल, त्याचे ते दर्शन तुम्हाला रुचेल का? वास्तवाच्या काठीच्या तडाक्याने तुमच्या मनातल्या या बाल कृष्णाच्या मूर्तीचा चकणाचूर तर होणार नाही ना..? मोठ्या ममतेने या बालकृष्णाच्या चेहऱ्यावरून हात फिरवताना सत्य परिस्थितीचे दाढीचे खुंट तुमच्या हाताला टोचायाचे तर न आहीत ना? बंधू विचार करा. कल्पना आणि भावनांच्या पंखांवर कितीही भाराऱ्या मारल्या तरीही वास्तवाच्या एका बाणाने तो पक्षी मातीतल्या धुळीत तडफडेल. तुमच्या या प्रेषिताचे पंख सोन्याचे असले तरीही पाय मातीचेच आहेत. हा कसला वेडा अट्टाहास.? एका सर्वसामान्य माणसाला देवाच्या रुपात पाहण्याची वृत्ती हि विकृतीच् आहे. तुम्हचे वय काय त्याचे वय काय? तुमच्या दोघांच्यामध्ये ते अंतर एखाद्या कालिंदीच्या प्रवाहासारखे वाहते आहे. ते तुम्ही कसे पार करू शकाल. बंधू खरोखरच तुम्हाला बजावतोय या वयातल्या अंतराच्या कालिंदीच्या भोवर्यात तुमच्या कल्पनेतला हा बाळकृष्ण तुम्हाला बुडवूनही टाकेल. बुडत्याला काडीचा तरी आधार असतो. तुमच्या दोघांतल्या शाब्दिक कलाकुसरीवर उभे राहिलेले हे नाते संबंध तुम्हाला कसलाही आधार देऊ शकणार नाहीत. दोघांच्या वयातल अन्तर कधीही संपणार नाही. ज्याला तुम्ही परम सखा म्हणता तो तुमचा साधा मित्रही होऊ शकत नाही. नियतीची चूक सुधारण्याची चुकल करण्याचा प्रयत्न करू नका. कारण त्या चुकीला माफी नसते. आणि शिक्षा एकाच असते. ते म्हणजे एकटेपणाच्या ज्वालेचे दाहक वास्तवाचे चटके. बंधू हात भाजतील तेव्हा त्यावर फुंकर घालायला काय पण थुन्कायालाही हा तुमचा बाळकृष्ण तयार नसेल. कुठल्याश्या मयुर पंखी साठी हा तुमचा बाळकृष्ण तुमच्या भावविश्वाचे घरटे सोडून आकाशात भरारेल तेव्भा तुमच एकटेपण तुम्हाला जाळेल. सर्वसामान्य जगात राहणाऱ्या माणसाला जगाचे सर्व नियम पाळावेच लागतात. नाते संबंधांच्या यमुनेलाही नियमांच्या किनार्यांच्या आताच वाहाव लागत. फक्त शब्द आणि भावनाच्या आधारावर उभारलेले हे नाते संबंध वाळूच्या किल्ल्यासारखे कोसळून पडतात.
बंधूंच्या चेहऱ्यावर रागाची एकही छटा नव्हती ,माझ्याकडे बघून ते म्हणाले"कविराज क्षमा करा पण तुमच्या या सल्ल्याचा आम्हाला राग येत नाही पण आम्हाला तुमची कीव येते
,शब्द सृष्टीचे अनअभिषिक्त राजे तुम्ही आणि तरीही शब्द आणि भावनांची ताकद विसरता ,कविराज शब्द म्हणजे केवळ स्वर आणि व्यंजनांचे वंध्या मैथुन नव्हे तर तो असतो चीत्कलेचा एक उत्त्पती यज्ञ.ज्या विश्वात तुम्ही आणि मी आहोत त्या विश्वाची उत्पत्ती एका ओम्कारातून झाली आहे ,हे तुम्ही विसरलात का?आम्हाला आमच्या ह्या प्रेषिताची सुवर्ण कांती जेव्हढि भावते तेव्हढाच त्याच्या मातीच्या पायाचा मृद गंधही ,ज्या दैवताने हा प्रेषित आमच्या साठी पाठवला आहे त्या आकाशा पेक्षाही मोठ्या असलेल्या दैवताचे नाते मात्र सदैव मातीशीचजोडलेले आहे .वयातले अंतर सांभाळून आणि जगाचे नियम पळून केलेले प्रेम हे बऱ्याच वेळा बुद्धिबळाच्या पटावरचे द्यूत असते ,जिथला हत्ती सरळच चालतो आणि उंट तिरका ,कोणीतरी हरण्यासाठी आणि कोणीतरी जिंकण्यासाठी हा खेळ चालतो,ज्या खेळत हार आणि जीत नसतेच त्याला कसले यम आणि कसले नियम ,. यम नियमांचे पालन न करता बहरणारे हे प्रेम जेव्हा भक्तीचे रूप घेते तेव्हाच अमर होते.
कविराज काहीतरी गल्लत होते आहे तुमची "प्रणय आणि पराक्रमाचे पर लाऊन आमचा पंचम मयूर पंखीच्या शोधात भरारी मारेल हे आम्हाला माहितीच आहे" तो हि आमचाच पंचम असेल पण आमच्या कुशीत शांतपणे पहुडलेला आमचा बाळकृष्ण मात्र आम्हाला सोडून कधीही जाणार नाही ,भावना आणि भक्तीच्या पान्ह्यावर पोसलेला हा बालकृष्ण मात्र सदैव आमच्या हृदयातच राहील.
विराज ज्या देवाला तुम्ही कधी पाहिलेही नाही त्या देवाला तुम्ही मूर्तीचे रूप देता आणि त्याची तुमी भक्ती करता ,चराचरी परमेश्वर पसरला आहे म्हणून कंठशोष करता पण जिवंत माणसातले परमेश्वर रूप नाकारता,जर जिवंत माणसातले देवत्व जाणवले नाही तर अमुर्तातल्या देवत्वाला कसे जाणाल ,पंचम मध्ये आम्हाला दिसणारा बाळकृष्ण आणि तुम्हाला दिसणारा तरुण एकच आहे हे समजायला शंकराचार्यांचअद्द्वैता वाद कळण्याची जरुरी नाही ,ते ज्ञान आम्हाला अडीच अक्षरांच्या मंत्र बलाने प्राप्त होएते ,त्या मंत्राला तुम्ही प्रेम म्हणा अथवा भक्ती "अक्षरे अडीचच हि अडीच अक्षरे तुम्हाला तुमच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची साधना करवते ,ते माणसाचे माणसावरचे प्रेम असो कि ईश्वरावरची भक्ती .हि विविधता एकाच परब्रम्हाची ललिते आहेत हे कळायला हा अडीच अक्षरांचा मंत्र आत्मसात करावा लागतो .म्हणुनतर महाकाविलाही अगम्य असलेले हे ज्ञान अक्षर ओळखही नसलेल्या संतालाही प्राप्त होते ,
आमच्या मनातला बाळकृष्ण हा फक्त आमचा आणि आमचाच आहे ,खरया कृष्णालाही आमचा हा बाळकृष्ण कदाचित दिसणारही नाही ,कारण तो बघायलाही आमचीच दृष्टी लागते '
कविराज जन्मापासून आंधळ्या असलेल्या सुरदासालाही रंग ज्ञान देणारा हा दिव्या स्पर्श फक्त प्रेमाचाच असतो ,वास्तवाचे कडक उन्हा त्या निळाई च्या गडद छटा कधीही फिकट करू शकत नाही
आम्हाला वाटते कि स्वामी त्याच्याच रूपाने आमच्या कडून भक्ती करून घेतात ,आकाशातल्या चंद्राचे प्रतिबिंब तळ्यातल्या पाण्यात स्वच्छ दिसावे तसे ह्या साक्षात्काराचे एक प्रतिबिंब त्याच्याही मनात उमटलेले आम्हाला दिसते ,आमच्या भक्तीला त्याच्या रूपाने स्वामीच प्रतिसाद देताहेत असे आम्हाला मनोमन वाटते ,त्याच्याच रूपाने ते छोट्या बाळासारखे रुसतात भाराव म्हणून हट्ट करतात मला थोपटून झोपावं म्हणून सांगतात आमच्या दोघातले हेप्रेम जिव्हाळा हे त्यांच्याच इछाचे प्रगटिकरण आहे असे आम्हाला वाटते
आणि हे सर्व एक तर्फी नाही पंचामाही तेवढ्याच जिव्हाळ्याने हे नाते जपतो आहे , आमच्याकडे तो जेव्हा येतो तेव्हा तो खरोखर लहान होऊन येतो त्याच्या चेहऱ्यावरची निर्वाज्याता आमच्या मनातल्या पितृभावांना पुकारते कविराज हे जन्माजान्मान्तारीचे हे नाते आम्ही नाकारूच शकत नाही त्या जिव्हाळ्याच्या महापुरात बाकी सगळ्या भावभावना वाहून जातात उरते ते ते फक्त ह्या नाते संबंधांचे एक दृश्य रूप ,कविराज तुम्हीच सांगा आमचे काही चुकते का ?
एवढे म्हणायला पंचम दरवाजा उघडून आत आला त्याचे माझ्या कडे लक्षही नव्हते "बंधू भूक लागलीय आम्हाला ,त्याच्या चेहऱ्यावर एक भुकेजलेले बालक विराजत होते मोठ्या काकुळतीने ते खायला मागत होते ,बंधूनी त्याला हाताला धरून बसवले आणि टेबलावर ठेवलेल्या डब्यातून शिरा भरवला ,दोघांचेही माझ्या कडे लक्ष नव्हते भरवून झाल्यावर दुधाचा पेला त्याच्या ओठाला लावला आणि मग न्याप्कीन ने त्याचे तोंड पुसले त्याच्या केसातून प्रेमानी हात फिरवला त्या प्रेमाची पावती पंचम च्या चेहऱ्यात दिसत होती .प्रेम आणि जिव्हाळ्याचा त्य पवित्र संगमात माझ्या मनातले शंका कुशाकंचे सर्व प्रश्न विरघळले होते त्या देवदत्त नात्याचा दिव्य स्पर्श माझ्याही मनाला झाला होता
अरे कधी आलास तू ह्या पंचामच्या प्रश्नाकडे माझे लक्ष्य हि नव्हते ,बंधूंच्या टेबला मागे एक स्वामींचा मोठा फोटो होता त्या फोटोतले स्वामी जणू माझ्या कडे बघून हसत होते
नकळत हात जोडले गेले एक ईश्वरीय साक्षात्कार माझ्या हि मनाला झाला होतानकळत एक संवाद स्वामींकडे साधला गेला मनोमन प्रचितीचे उद्गार आले "हा दिव्यानुभव माझ्यासारख्या नास्तिकाला देण्याचे सामर्थ्य फक्त हे स्वामी फक्त तुझ्यातच आहे"पंचम आणि बंधू दोघेही माझ्याकडे विस्फारित मुद्रेने बघत होते ,माझ्या जोडले गेलेल्या हातांकडे बघून पंचम च्या डोळ्यात अश्रू तरले ,त्याच्या प्रिय स्वामिना त्याच्या जिवलग तरीही नास्तिक मित्राने आदराने हात जोडले होते होते,आनंद अश्रुनी बाहेर धाव घेतली होती बंधूंच्या मेजावर शिऱ्या ची वाटी पडली होती त्यातला एक चिमुटभर उरलेला शिरा मी तोंडात घातला ,शिरा आणि प्रसाद ह्याच्या चावितला फरक उमगला
अचानक महाभारतातल्या राजसूय यज्ञातलि मुंगुसाची गोष्ट डोळ्यापुढे आली ,अर्धे अंग सोन्याचे असलेले एक मुंगुस यज्ञाच्या जेवणावळीत पडलेल्या उष्ट्यात गडबडा लोळत होते धर्मराजाने तू असे का कारतोस विचारताच ते म्हणाले राजन एका निर्धन ब्राम्हणाने आणि त्याच्या परिवाराने स्वतः उपाषी राहून अतिथीला वाढलेल्या अन्नाच्या उष्ट्याचे काही कण मला लागले आणि माझे हे अर्धे अंग सोनेरी झाले ,यज्ञात दान केलेल्या ह्या जेवणावळीत राहिलेले अंग सोनेरी होतोय का बघतो मी ,पण अहंमान्यातेचा दर्प येणारे आणि समर्पणाच्या दिव्यास्पर्षाने वंचित असणारे ते अन्न त्याच्या उर्वरित अंगाला सोनेरी करू शकले नाही
आनंदाच्या डोहावर तरंगत घरी पोहचलो मला जेवायला नको पोट भरलाय म्हणून सांगून बिछान्यावर लवंडलो ,डोळे मिटताच ते मुंगुस मला दिसले त्याचे पूर्ण अंग सोन्याचे झाले माझ्या विस्फारित मुद्रे कडे पाहून ते म्हणाले अरे असे काय बघतो आहेस माझे अंगाच सोन्या चे झाले आहे पण तुझेतर मनही सोन्याचे झाले आहे ,हसण्याचा आवाज आला म्हणून बघितले तर बंधूंचा बाळकृष्ण तृप्त मानाने प्रसन्नपणे हसत होता
,,
क्रमशः
शशांक रांगणेकर


No comments:
Post a Comment