Thursday, February 12, 2015

कविराज

कविराज
वाढदिवसाच्या दिवशी सकाळीच पंचमचा फोन आला. मी त्याला WISH  करायच्या अगोदरच त्याने मला ताबडतोब घरी ये म्हणून सांगितले . आंघोळ हि झाली नव्हती. पण, साहेबांचे फर्मान आल्यावर अपिलच नव्हते . कसेबसे तोंड धुतले आणि बाईकवर टांग टाकून पंचम च्या घरी पोहोचलो. घरी जाताच दरवाज्यातूनच त्याला WISH  केले  आणि बैलाने करकचून मिठी मारली. गलिव्हरच्या मिठीतला लीलीपुट कळवळत होता. अरे साल्या हळूहळू, मानसी वाटली कि काय...! डोळे वटारून बोलला, माताश्री आतच आहेत. आणि तू आला आहेस म्हणजे  त्यांचे कानही इथेच असतील  तर, मित्रवर्य कृपया हळू बोंब मारा. आणि मिठी म्हणायची झाली तर ती मानसी ला नव्हती तर अनन्याला मारली होती. अनन्याच नाव सकाळी सकाळीऐकताच कानशिले गरम झाली. कोल्ह्याला द्राक्षे आंबट, मी म्हणालो.
काकू बाहेर आल्या. ओढूनताणू खोटे ,खोटे हसून, ये ये म्हणून त्यांनी माझे स्वागत केले . माझ्या योग क्षेमाची सदैव काळजी बाळगणाऱ्या काकू, आपल्या कपाळावरची आठी मात्र लपवू शकल्या नाही. पंचम आरती तयार केलीये बसतोस ना पाटावर. टेबलावर बसता ताटल्या मांडता मांडता काकूंनी पंचम ला पाटावर बसण्याची ऑर्डर केली. आई ग बंधू कुठे आलेत अजून. अरे कौंफरंस आहे ना त्यांची आज. मग आता कसे येतील ते." येतील संध्याकाळी.नाही आताच येणार आहेत ते." एवढ म्हणायला आणि बंधू आत यायला एकाच गाठ पडली. आज सूटा  मधे बंधू रुबाबदार वाटत होते. हातात फुलांचा गुच्छ आणि डबा घेऊन बंधू आत आले. आल्याआल्या त्यांनी पंचम ला मिठीत घेतले आणि त्याच्या कपाळावर त्यांनी आपले ओठ लावले. स्वामी तुला उदंड आयुष्य देवो. बंधूंनी आशीर्वाद दिला. "आई लव्ह यु पंचम. आई लव्ह यु तू बंधू". हा त्यांचा नित्य नियमनाचा पाठ हि झाला. बंधू आल्याचे  पाहून काकाही बाहेर आले." बंधू बसाना, अग नाश्ता आणतेस ना...काका म्हणाले. तुम्ही घाईत असाल बंधू पण थोड काही घेतल्याशिवाय जायचं नाही. अरे आता माझ्याजवळ पूर्ण एक तास आहे बंधू म्हणाले. . काकूने गरम गरम पुऱ्या आणल्या आणि श्रीखंडाचा डबा उघडून टोपात घालून तो टेबलावर ठेवला. चमचे तिथेच ठेवलेयात रे.काकूंनी पंचम ला सांगितले. खायला सुरुवात करताना बंधूंनी एक चमचा श्रीखंड पंचम च्या जवळ नेल. तोंड न उघडता, लहान मुला सारख फुरंगटून पंचम म्हणाला बंधू चमच्याने का हाताने का नाही. सर्वांच्या समोर तुम्हाला लाज वाटत असेल तर राहुद्या. पण, हे अस खिलवण तुम्हाला आणि मला दोघांनाही आवडत नाही. चमचा खाली ठेवून हाताने पुरीचा एक तुकडा तोडून श्रीखंड लाऊन बंधूंनी पंचम ला भारावल.कमीत कमी तीन पुऱ्या  तरी भारावल्या पाहिजेत. नाहीतर उपाशी राहीन  मी.ओके..ओके....तीनच काय पाहिजेत तर पाचही भरवतो मी. बंधू म्हणाले. हो तर, पाचच कशाला एक चिऊ चा, एक काउचा म्हणत सगळेच घास भारावून घेशील तू त्यांच्याकडून.एकवीस वर्षाचा घोडा झालास डॉक्टर होशील तू आता. पण, बंधूंकडून सगळे लहान मुलांसारख लाड पुरवून घेणे काही सुटत नाही. बंधू, किती लाड करता तुम्ही त्याचे. कधी परतफेड करेल तो त्याची.का..? मी त्याच्याकडे जन्म घेतला कि तो माझे लाड करेल...खरे ना पंचम, बंधू म्हणाले. आतापर्यंत गप्प बसलेले काका म्हणाले, तुमच ते काय contract आहे ते मला माहित नाही, पण गणित काही जमत नाही. पंचम आहे आता बावीस वर्षाचा आणि तुम्ही पंचावन चे. सामान्य वयोमानाप्रमाणे अजून कमीत कमी वीस वर्षाची मुदत परमेश्वराने तुम्हाला दिली आहे अस मानायला काहीच हरकत नाही. मग कस काय जमायचं हे गणित. मग ती मुदत पंधरा वर्षाने कमी करायला मी सांगेन स्वामींना. बंधू शांतपणे म्हणाले. विजेचा लोळ पडावा तसे ते वाक्य मला वाटले. अतिशय शान्तपणे बंधू उद्गारले. पण आम्ही सगळेच जण हादरल्यासारखे झालो. बंधूंनी तो डायलॉग मारला नव्हता.स्वामी निष्ठेचा आणि पंचमवर च्या प्रेमाचा एक अभूतपूर्व संगम त्यांच्या डोळ्यांत दिसत होता. माझ्या मनातली बेचैनी वाढली. वातावरणातला तणाव थोडा कमी करावा. म्हणून मी बंधूंना म्हटलं बंधू श्रीखंड आम्हालाही आवडते . अरे हो sorry तुम्ही घ्या श्रीखंड. एक चमचा श्रीखंड बंधूंनी मलाही चमच्याने भरवले . चमचा आणि हात यातलं अंतर मात्र मला बेचैन करून गेले .
पंचम एक छानसा अभंग पटकन म्हणा. बऱ्या च दिवसात ऐकला नाही. पंचम ने स्वामींच्या"फोटोला नमस्कार केला आणि अतिशय गोड आवाजात ' कानडा राजा पंढरीचा ' हा अभंग मन लाऊन म्हटला." रूप तेरा मस्ताना प्यार मेरा दिवाना म्हणणारा माझा मित्र अतिशय भावूकतेने अभंग आळवत होता. अभंग संपताच बंधू भारावून उभे राहिले. पंचम च्या जवळ जाऊन त्याचे डोके मिठीत घेऊन त्यावर आपले ओठ टेकवले. भावनेने ओथंबलेल्या सद्गदित आवाजात म्हणाले. वेदांना तो पंढरीनाथ कळला असेल कि नाही मला माहित नाही. पण, ज्या भक्तीने तू त्यांना आळवलस त्यावरून नक्कीच वाटत कि तुला मात्र तो नक्कीच उमगला आहे. अर्रे तुझ्या या भावपूर्ण आळवणी ने तो पंढरीनाथ आपल राउळ सोडून बाहेर येऊन तुझ्यासाठी उभाही असेल. पंचम तुझ्या बंधूला शिकव रे हा भक्तीभाव. पंचम कडे बघितले. पंचम च्या नजरेतही मला खरोखर वेगळे भाव दिसत होते. एखादा सही आयटेम समोरून जाताना बघून परफेक्ट वाइटल STASTIC सांगणार हा माझा यार वेगळाच भासत होता. सगळाच अगम्य होत.अभंगातल्या. त्या पंढरी नाथ सारखे. थोड्याच वेळात बंधूंचा ड्रायवर एक फुलांचा गुच्छ आणि दोन चिठ्य घेऊन आला. एक बंधुंसाठी आणि एक पंचम साठी.पंचम च्या चिठीत लिहील होत 'happy birthday डॉक  ' आणि बंधूंच्या चिठीत लिहील होत 'येताना.?..!' लगबगीने बंधू उठले पंचम ला शेकहांड करत म्हणाले अब जानेकी इजाजत है ना...! पंचम ने हसून हो म्हटलं आणि ते निघाले. निघता निघता काकूंच्या लक्षात आल कि बंधूंच्या टायवर लाल कुंकवाचा डाग पडला होता. ती म्हणाली थांबा बंधू तुमच्या टायवर कुंकवाचा डाग पडलाय पुसून घेते हलक्या हाताने. फार लाड करता तुम्ही, तुमच्या या लाडक्याचे. जरा डाग पुसू दे कोन्फारंसला जायचं आहे ना तुम्हाल. तिला थांबवत बंधू म्हणाले, अग वेडी का खुळी तू. अग हे प्रसाद चिन्ह आहे. अशी प्रसाद चिन्ह काही पुसायची थोडीच असतात. स्वामींच्या फोटोसमोर हात जोडून बंधू निघाले. बंधू काय मागितलात स्वामींकडे, मी त्याना विचारलं. बंधू म्हणाले, एवढ दिल्यानंतर आणखी काय मागू. तुझी साथ आणि हा प्रसाद जन्मजन्मांतरी माझ्याकडे राहूदेत अशी प्रार्थना केली स्वामींकडे .
बंधू निघून गेले. मागे वळून बघितले तर, पंचम स्वामींपुढे हात जोडून उभा होताआणि मी मात्र एका वेगळ्याच विश्वात होतो. स्वामी, बंधूंची मुदत कमी करण्याची मागणी, इर्षेने अभ्यास करून मेडल मिळविणारा हा माझा यार, आणि पंढरीनाथाला तेवढ्याच भक्तिभावाने आळविणारा हा माझा मित्र. सुटाबुटात कॉन्फ्रंसला जाणारे   आणि तरीही  टायला लागलेल्या कुकवाचा डाग काढायला नाकारणारे बंधू यात मी मात्र एकटाच होतो. मी, माझी कलंदरी कविता आणि माझी अनन्या. माझा मित्र पंचम, या जगापासून वेगळ असलेल हे जग माझे  नव्हते . आईच वात्सल्य, अनन्याचे  उबदार आणि पंचमचे  आश्वासक अशा अनेक प्रेमाच्या छटा मला माहित होत्या. कुठल्या न कुठल्या माझ्या कवितेत ह्या छटा  शब्द बद्ध  होत होत्या. प्रत्येक छटेला वेगळा रंग होता आणि चौकटही होती. नात्याचं लेबल लाऊन, त्या त्या नात्याला लेबलही होत. हे आईच, हे, प्रेयसीचे   हेमित्राचे , हे भावचे , हे वडिलांचे अश्या  वेगवेगळ्या लेबल खाली मी पण एक चाकोरीतल प्रेम करत होतो. शब्दांची, भावनांची एक देवाणघेवाण करत होतो. स्वतःचे असले तरीही ठराविक भावना, अपेक्षा आणि जडणघडणीच एक समृद्ध प्रेम जीवन माझाही होत. पण या सगळ्यापेक्षा मला ते अगदीच चाकोरीबद्ध वाटत होत. वय, सामाजिक स्थान, आवडीनिवडी, रक्ताचे नाते या कुठल्याही चौकटीत न बसणारे ते भावबंध, काय म्हणायचं त्यांना...! नावच नव्हत कारण कुठल्याही लौकिक नातेबंधंच लेबल त्याला चिकटल नव्हत. पण, या अनोळख्या प्रेमाबद्दल मला एक वेगळेच कुतूहल होते .स्वामींवरची अगाध भक्ती हि त्या प्रेमाची एक मजबूत बैठक होती.

त्यांच्या पुरते त्याचं जग स्वामी, बंधू आणि पंचम या तिघांचेच होते पंचम आणि बंधूंची स्वतःची वेगवेगळी जग होती. आणि नातेसंबंधही. पण त्यांच्या त्या सामान्य जगाच्या आणि त्या दोघांच्या जगाच्या कक्षा कधीही एकमेकांना घासत नव्हत्या. त्या दोघांच जग तिघांचाच होत. स्वामी भक्तीच्या श्वासाच्या स्पन्दानावर बहरणार एक आगळ वेगळ नाते . दोघांचाही ठाम विश्वास होता, कि दोघांची भेट स्वामींच्या इच्छेने झाली आहे. जणू त्या नाते बांधाची प्रेरणाच स्वामी भक्ती होती. श्रद्धा आणि भक्तीची दिव्य कवच कुंडले लाभलेला तो जिव्हाळा एका पवित्र मंदिरासारखा मला वाटत होता.पण, तरीही एक सल मनात होती.कि, त्या तिघांच्या जगात माझ्या वाट्याला एक बघ्याची सोडून दुसरी कोणतीच भूमिका नाही.पंचम माझा बालमित्र होता. विद्यार्थी आयुष्यापासून आमची मैत्री होती. मी व तो सदैव बरोबर असत. अभ्यास,मास्तरांच्या खोड्य, चोरून सिगारेट ओढन, पोरींवर लाईनी मारणं सर्व गोष्टी आम्ही बरोबरीने केल्या होत्या. माझ्या आणि पंचम मधे मला कधीही अंतर भासल नव्हत. आता मात्र मला ते अंतर भासत होत. तो माझ्यापासून दुरावला आहे अस मला वाटत होत. तो दुरावला आहे अस वाटण्यापेक्षा त्याच आता एक आणखी वेगळ जग आहे अस वाटायला लागल होत. ते जग जे फक्त त्याच, बंधुंच आणि स्वामींच. त्या जगाचा तसा म्हणाल तर काहीच त्रास नव्हता. माझ्या आणि पंचम च्या मैत्रीच्या आड ते जग कधीही आणि केव्हाही आल नव्हत.पण तरीही, त्या जगाच्या बाहेरच मी उभा  आहे 'outsiders are not allowed 'अशी भलीमोठी पाटी मला दिसत होती. एक असह्य हुरहूर माझ्या मनाला लागली होती आणि ती नुसतीच हुरहूर नव्हती तर या नाते संबंधांबद्दल वाटणार एक कुतूहल. पंचम ला काही क्षणा पुरता का होईना माझ्यापासून दूर करणारे ते नाते माझ्यासाठी कुतूहलाचा विषय  होता. एक एकवीस-बावीस वर्षाचा तरुण डॉक्टर आणि पन्नाशी पार केलेला उद्योजक यांच्यात इतका जिव्हाळा असण्याचा कारण काय..? स्वामींवरची भक्ती हाच मला दोघांतला कॉमन दुवा वाटत होता. कुठेना कुठे पंचम दूर जाण्याची सल मनात होतीच. एकाच देवतेवर   अगाध  निष्ठा  ठेवणारे बरेच लोक असतात आणि माझ्या पाहण्यातही होते. पण त्या नि एकमेकांवर निष्ठा ठेवणारे कोणीही माझ्या पाहण्यात नव्हते. ह्यांच्याबाबतीत तर स्वमिन्वरची  अपरंपार श्रद्धा आणि एकमेकांवाराची प्रीती हि जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या.
.
.गोविंदांचा दिवस होता. सकाळीच पंचम घरी आला आणि म्हणाला चल हंडी बघायला जाऊ.. पंचम च्या हाकेने मी खाली आलो. बाईक घेऊनच तो आला होता. कित्येक वर्षांचा तो आमचा परिपाठ होता चल, माझ्याच बाईक वरून जाऊ तो म्हणाला. . मागे मी बसलो..हवेच्या झोताने पंचमची क्वालर उडत होती ,आणि गळ्यात घातलेला गोफ हि ,माझ्या लक्षात आले कि त्या गोफात एक सोन्याचे पदक घातलेले आहे ,एक नाजुकसे तुळशीपत्र ,प्रथमच मी ते पाहत होतो ,हे काय रे कधी ,आणि कुणी केले हे ,आणि मला संगीतलेही नाहीस ना,चल काढ ते आणि दे मला ,आपला करार विसरलास का ?,आमच्या दोघात असलेल्या गाढ मैत्रीनी अधोरेखित केलेला एक परिपाठ दोघांपैकी कोणालाही काही नाविन वस्तू  मिळाली कि पहली ती दुसऱ्याने वापरायची ,आमचे बाकी सर्व मित्र ह्यावर नको ते आणि नको  तेवढे प्रश्न विचारायचे ,पण आमची मैत्री त्या सर्वाना पुरून उरली होती. "sorry ,मी देऊ नाही शकत हे तुला ,पंचम उद्गारला ,ज्याने मला हे दिले तो लौकिक अर्थाने माझा कोणीही लागत नाही ,पण जेव्हा त्याने हे देताना मला सांगितले कि हे श्रीकृष्णाला त्याच्या भक्ताने वाहलेले तुळशीपत्र आहे.हे त्या श्री कृष्णावर असलेल्या अगाध प्रेमाची साक्ष आहे ,हे कधीही दूर करू नकोस ,आणि त्याचे साक्षी आहेत स्वामी, ह्या देवाण घेवाणीचा आणि माझा काहीही सबंध नाही आणि म्हणूनच मी तुला हे देऊ शकत नाही ,पंचम म्हणाला, नेहमी प्रमाणे आम्ही समुद्र किनार्यावर गेलो ,,माझे कुठेही लक्ष्य नव्हते ,वाळूतून चालताना माझे पाय अधिकाधिक रुतत होते .डोळ्यासमोर नकळत कुठून तरी एक भला मोठा तराजू दिसला .त्याच्या एका पारड्यात पंचम होता आणि मी बाहेर होतो ,मी एका हाताने पंचमाचा हात धरला होता ,कुठ्नसे एक नाजुकसे तुळशी पत्र गिरगीरत आले आणि दुसऱ्या रिकाम्या पारड्यात पडले आणि त्या वजनाने दुसरे पारडे खाली आले आणि माझा हात सुटून पंचम असलेले पारडे पार वर गेले होते ,हात सुटल्याने मी वाळूत उताणा पडलो होतो ," कुठे आहेस तू पंचम आणि माझा हात का सोडलास मी जोरात ओरडलो अरे मी इथेच आहे आणि जोरात आलेल्या लाटेने हात सुटला पण तू एवढा घाबरलास का ,हात किती थंड पडलाय तुझा बरे वाटत नाही का ,हो निघूया आपण ,बाईक वर त्याच्या मागे बसून मी घरी गेलो ,त्याने घराच्या समोर कचकन ब्रेक मारून बाईक थांबवली ,माझे लक्षच नव्हते ,उतरल्यावर मी त्याला विचारले हा श्रीकृष्णाचा भक्त कोण रे बंधू का? माझा हात हलकेच दाबून पंचम निघून गेला होता.जड डोक्याने मी घरी गेलो बिछान्यावर लवंडलो , मम्माला जोरात ओरडून सांगितले मला जेवायला नकोय झोपतोय मी पण झोप लागत नव्हती ,तीही दूर गेल्यासारखी वाटत होती पंचम सारखी ,डोळ्यासमोर दिसत होते गिरक्या मारणारे एक नाजुकसे तुळशी पत्र..

क्रमशः
शशांक रांगणेकर


------------------------
------------------------



No comments:

Post a Comment