Tuesday, March 3, 2015

पुनरागमन


                           पुनरागमन

दुसऱ्या  दिवशी संध्याकाळी माझा राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार झाला .सत्काराच्या  वेळी दादांचा फोन आला कि मला मुलगा झाला आहे. शेखर खुणा करून मला हि बातमी कळवत होता .सत्कार समारंभ  संपवून आम्ही हॉटेल वर गेलो .दादांनी फोन वरून सांगितले कि बाळ  आणि मंजुषा सुखरूप आहेत आणी  झोपली आहेत, आदि मात्र झोपला नव्हता ,बोबड्या भाषेत म्हणाला "काका आपल्या कडे बाल आला आहे ,लवकर बघायला ये "."उद्याच येतो "मी म्हणालो ,इथली काळजी करू नकात ,बाळ बाळांतीण दोघेही सुखरूप  आहेत ,वाहिनी म्हणाल्या ,सत्काराचा कार्यक्रम सर्वांनी दूर दर्शन वर बघितला होता .

"पंचम झोपूया आता "शेखर म्हणाला फ्लाईट पहाटेची असल्याने आम्ही झोपलो ,थकल्याने बिछान्यावर पडतापडताच  झोप लागली . डोळे आसवानी भरून आले होते सुखाच्या राशीवर असूनही मी दुखखी  होतो ."स्वामी सगळे दिलेस पण हे बघायला माझे बंधू कुठे आहेत ,त्यांचा तो प्रेमळ स्पर्श मला आज पाहिजे होता
त्या वाचून मी भिकारी आहे रे "डोळे पाझरत होते आणि मनही  हलकेच झोप लागली ,पाहटे पहाटे स्वामींच्याच
शब्दांनी जाग आली "तू जिथे तिथे तो आणि मीही  उद्याच तुला आमच्या शब्दांची प्रचीती येइल. "

सकाळी विमानात  बसलो ,मन घराकडे घिरट्या मारत होते ,विमानतळावर दादा आणि आदी आले होते ,"काका बाल आला आहे पण तो सारखा रडतोय आमच्याशी खेळत नाही तो आजीने त्याला बांधून ठेवले आहे "अस का ?
आपण सोडवूया त्याला    मग आपण खेळूया मी म्हणालो .गाडी हॉस्पिटलच्या आवारात शिरली ,मी उतरताच टायगर ने भुंकून मला स्वामी आणि बंधूंच्या फोटो समोर थांबवले ,तिथे डोके ठेऊन मी आत गेलो.


आई ,माजी , वाहिनी मंजुशाच्या रूम मध्ये होत्या  बाळ  रडण्याचा  आवाज येत होता ,मंजुशाच्या चेहऱ्यावर सुखाची साय दाटली होति.        घे बाबा बाळाला माजी म्हणाल्या आणि बाळाला अलगद उचलून त्यांनी माझ्या हातात दिले ,मी आनंदाने बाळाला कवटाळले ,"स्वामी समर्थ "मन हुंकारले "मानत विचार आला आज तुम्ही असायला हवे होतात बन्धु.  बाळा नि  इतक्यात माझ्या अंगावर सुसु केली ,,आईने दुपटे सोडवले ,आणि आई आणि माजी बाळाला पुसू लागल्या, माजींचे  लक्ष बाळाच्या छातीकडे गेले त्याच्या छातीवर एक सुस्पष्ट कुणालाही कळेल अ शी तुळशी पत्राची जन्म खूण  होति.

"बंधू माझ्यासाठी परत आलात ना "मनात विचार उमटले  नकळत स्वामींच्या फोटो कडे लक्ष्य गेले  माझा स्वामी माझ्या कडे बघून मिश्किलपणे  हसत होता फ़ोटोच्या  गळ्यातले बिल्व पत्राचे त्रिदल एका वेगळ्या आणि अपूर्व तेजाने  नाहून निघाले होते ,बंधूचा पारिजात फुलांनी बहरला होता .

बंधू तुम्ही माझे कोण ?मनात प्रश्न आला , मला माहित नाही  स्वामींना विचार , मलाही माहित नाही  उत्तर आले पण आकाशातून . श्री  स्वामी समर्थ'
शशांक रांगणेकर

९८२१४५८६०२ 

No comments:

Post a Comment