Tuesday, March 3, 2015

सोहळा

           सोहळा               
मंजुषा च्या वडिलांची   घरच्या नि   घेतली आणि आमचे लग्न रीतसर ठरले ,आई आणि माजीनी शेखरचे हि लग्न ठरवले ,दोन्ही विवाह  सोहळे एकाच दिवशी संपन्न झाले ,दादांना पाया पडताना दादांनी  मला मिठी मारली ,तुम्हाला  आशीर्वाद   देतो कि दिन दुबळया च्या  सेवेत  तुमचे आयुष्य संपन्न होऊ दे ,तुमचे बंधू तिथेच तुम्हाला भेटतील .दादा म्हणाले"   बंधूंच्या आठवणीने मन परत पाझरले डोळ्यातून अश्रू वाहायला लागले .
आयुष्यात सुख ओसंडून जात होते ,रुग्णसेवे पुढे मला आणि मंजुषा ला  वेळ कमी पडत असे ,मंजुषा  कधीही तक्रार करत नव्हती ,वाहिनी सारखे तीनीही रुग्ण सेवेला बांधून घेतले होते .

मंजुषा गरोदर असल्याची बातमी तिनी मला सांगितली वहिनीनी तपासणी  करून त्यावर शिक्का मोर्तब केले. घरात सगळ्यांनाच आनद झाला आई ,माजी ,आणि वाहिनी ह्या तीन देवियांच्या निगराणी खाली मंजुषा चे कोड कौतुक होत होते. आनंदाचा क्षण जवळ येत होता .

एक दिवस राज्य सरकारच्या वैद्यकीय विभागातून फोन आला बंधू रुग्णालयाच्या अपूर्व कामगिरी साठी केंद्र सरकार तर्फे माझा सत्कार होणार होता राष्ट्रपती भवनात हा सोहळा संपन्न होणार होता ,
शहरात हि बातमी कळली आणि बंधूवर लोकांची रीघ लागली ,हॉस्पिटलच्या सहकार्यांच्या उत्साहाला उधाण  आले होते .त्यनि सर्वत्र रोषणाई केली होती ,सतत स्वामी धून वाजत होति. दादांनी मला स्वामी आणि बंधूंच्या फोटो पुढे नेले माझ्या डोक्या वरून हात फिरवला माझ्या मस्तकाचे  अवघ्राण करून ते म्हणाले "बंधू बघितला का हा आपला पंचम केवढा मोठा झालाय तो ,आगदी आभाळा येवढा त्याला आशीर्वाद द्या कि त्याच्या आभाळ मायेचे पांघरूण अनेक दिन दुबळ्यांना लाभू द्या .स्वमि कृपा त्याला सदैव साथ करू द्या .दादांच्या डोळ्यातून  वाहणारे अश्रू माझ्या डोळ्यातून पाझरणाऱ्या  अश्रूत कधी सामावले ते कळले पण नाही .

दुसर्याच दिवशी दिल्लीला निघायचे होते ,मंजुषा चे दिवस भरत आले होते ,मी आणि शेखर दिल्लीला निघालो ,मंजुषाला अश्या अवस्थेत  सोडून जाताना माझ्या मनात काळजी डोकावत होती ,'माझ्या चेहऱ्या वरची काळजी पाहून    मंजुषा म्हणाली   तुम्ही काळजी करू नकात स्वामी आहेत माझ्या बरोबर ". मनावरचा मोठा बोझा  उतरला आणि काळजी 
स्वामींच्या पायाशी सोडून मी आणि शेखर दिल्लीला निघालो 

No comments:

Post a Comment