मनोगत
स्वामी समर्थ हे माझे लाडके दैवत . अगदी "माझा स्वामी "म्हणण्या इतके . मी त्याची फार उपासना करतो पूजा अर्चा करतो अशातली गोष्ट नाही ,पण तो सदैव माझ्या बरोबर आहे हि अनुभूती मात्र कायमची मनात तेवत असते . तो माझा कोण आणि मी त्याचा कोण ?ह्या प्रश्नाचे नेमके उत्तर माहित नसूनही तो माझा इतका जवळचा आहे तेवढ्या जवळचे कोणीच नाही हि जाणीव मात्र मनात कायमची उमलत असते .त्याच्या आणि माझ्या नात्याला नाव नाही कारण एखाद्या नात्याला नावाचे लेबल चिकटले कि त्याच्या मर्यादा अधोरेखांकित होतात .अगदी आई बाप काका मामा मित्र गुरु सुद्धा ,पण इथे मात्र तसे नाही काही नाती एवढी व्यापक असतात कि बळीच्या अवतारा सारखी तिन्ही लोक व्यापूनही दशांगुळे अव्याप्त राहणारी . जेव्ह्या नात्याचे स्वरूप एवढे अमर्याद असते तेव्हा त्याला अमरत्वाची तेजस्वितता येते .
"तुळशीपत्र 'हि अशीच कहाणी आहे जन्म आणि मृत्युच्या सीमा रेषा पार करणारी आणि स्वामींच्या इच्छेने गत जन्माची खुण सांगत पुनर्जन्म घेणारी . हि कथा हे त्यागाचे ,पावित्र्याचे ,आणि निरलस प्रेमाचे प्रसादचिन्ह आआःए. आवड ,प्रेम भक्ती ह्या एकाच भावनेच्या चढत्या कमानी आहेत .
नात्याच्या सर्व लौकिक अर्थाना पार करून पुढे जाणारे नाते मग ते माणसाचे माणसाशी असो अथवा परमेश्वरा शी असो ते एका अत्त्युच्या पातळीवर पोहचते ,ह्या कथेतील तीन मुख्य पत्रे "बंधू पंचम आणि स्वामी ह्यांच्या अनुपम नात्याची हि कहाणी आहे ,ह्या नात्याला काय म्हणावे सगळेच अगम्य आणि अतर्क्य ,"मै गया नाही अभीभी जिंदा हु "असे सांगणाऱ्या स्वामींच्या अमरत्वाची प्रचीती देणारी एक अमर प्रेम कहाणी ."ह्या अलौकिक त्रिकोणात वर्तमान भूत आणि भविष्य सारे काही बंदिस्त आहे कारण ह्या सर्वांचा एकमेव स्वामीही तोच आहे
"श्री स्वामी समर्थ "

शशांक रांगणेकर

No comments:
Post a Comment