किती सुंदर पोहता तुम्ही,एक अनोळखे शब्द कानानावर पडले ,अभ्यासांनी थकून एकटाच तलावात उतरलो होतो ,आजू बाजूला लक्षही नव्हते ,आपल्याच मस्तीत पोहत होतो ,बाहेर आमच्या प्रोफ.dr .कुंतल उभ्या होत्या ,"माझ्या कडे बघून म्हणाल्या मी हि पोहते पण तुमच्या सारखे संथ आणि शांतपणे पोहता येत नाही मला .एखाद्या राज हंसाने पोहावे तसे डौलदार पोहता तुम्ही ,मला शिकवाल ,मी काय तुम्हाला शिकवणार मादाम ,खर तर त्यांच्या स्तुतीने मी सुखावलो होतो, डॉक्टर कुंतल आमच्या महाविद्यालयातल्या एकतरुण आणि ख्यातनाम प्राध्यापिका ,नुकत्याच त्या आमच्या कॉलेज मध्ये आल्या होत्या ,त्यांची शिकवण्याची हातोटी ,विषयावरचे प्रभुत्व ,रुबाबदार आणि सुंदर व्यक्तिमत्व ,आणि बाकी प्राध्यापकान पासून आपले वेगळेपण दाखवणारे अलिप्त वृत्ती सारे काही गूढ वाटायचे ,आपल्या कोऱ्या करकरीत गाडीतून डॉक्टर .कुंतल जेव्हा यायच्या तेव्हा तेव्हा त्यांचे वेगळेपण आम्हाला नकळत जाणवायचे ,,बर्याच वेळेला आमचे वरिष्ठ प्राध्यापकही त्यांना वचकून असायचे ,त्यांनी माझ्या केलेल्या स्तुती मी नुसता गोंधळ लोच नाही तर स्तब्ध हि झालो , माझ्या कडे पाहून त्या म्हणाल्या ,असुदे तुमच्या अभ्यासामुळे जमत नसेल तर राहूदे ,तस नाही मादाम ,माझे शब्द रोखताच त्या म्हणाल्या ,please हे मादाम चे ओझे आतातरी उतरवू दे मला ,प्रोफेसर आणि मादाम च्या झुलीखाली जीव कासावीस होतेय ,माझे ,माझे नाव कुंतल आहे कुंतल सरंजामे,आणि वर्गाच्या बाहेर तरी मला त्या नावाने कोणीतरी हक मारावी अस मला वाटते ,ह्या प्रोफ दर.कुंतल ला मोकळा श्वास घ्यायचाय,कुंतल आणि फक्त कुंतल ह्या नावाने कुठलीही प्रिफ़िक्स आणि सुफ़िकस न लावता, मला हि तुमच्या सारखेच काही क्षण मित्र मैत्रिणी बरोबर घालवावे ,आणि ह्या निरास आणि बेचव आयुष्याला काही मैत्रीचे सुखद क्षण लाभावेत ,असे वाटते ,बोलता बोलता मदमच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आपले डोळे पुसतच त्या म्हणाल्या sorry पंचम माझ्या वैयक्तिक अडचण कारण नसता मी तुम्हाला सांगितल्या ,मला क्षमा करा ,
वय आणि नात्यातले अंतर विसरून गेले मी ,एका बेसावध क्षणी एकटे पानाची खोल जखम भला भाळून वाहायला लागलीय,"पोरकी पोर"हो हो पोरकी पोर वयाच्या ८ वर्षी आई वडलांच्या प्रेमाला पारखी झालेली ए अनाथ मुलगी .पित्यांनी ठेवलेल्या अफाट संपत्ती आणि बुद्धिमत्तेचे वरदान आणि आई कडून मिळालेले हे सौंदर्याचे वरदान ,माझ्या बाबतीत मात्र शाप ठरलॆ आहे ,ह्या मुळे मला आपले म्हणणारा मायेने पाठी वरून फिरणारा एक हात मात्र मिळाला नाही ,उद्योग पती बाबा साहेब सरंजामे माझे वडील मला एकटीला आई कडे सोडून समाज कार्य करण्या साठी मध्यप्रदेश मध्ये गेले ,आणि माझी आई माजी सिने अभिनेत्री रुप देवी मला घेऊन लंडन ला गेली तिथे माझेपूर्ण शिक्षण झाले ते एका गवेर्नेस च्या हाता खाली ,बाहुला बाहुलीचे लग्न लावायच्या वेळेला माझ्या आई चे परदेशात लग्न लागत होते एकदाच नव्हे तर अनेकदा ,माझ्या वाट्याला आली ती कोरडी शिस्त ज्या वयात कळीचे फुलात रुपांतर होत असते त्या वेळेला मला दिसत होते माझ्या आईचे होणारे ४ थे किवा ५वे लग्न.,ज्या वयात मुलींच्या शरीरात बदल होत असतात त्या वेळेला माझ्या वाटयला आले होते शरीर शास्त्राचे पुस्तक,आई चा पाठीवर फिरणारा हात नव्हता न बापाच्या प्रेमाचे छत्र ,एखादे अनाथ मुल वाढावे तशी वाढली मी ,धनवान बाप आणि रूपसुंदर आईची एकुलती एक मुलगी आईचे प्रेम आणि बापाचा धाक ह्याचा पुसटता स्पर्श हि झाला नाही मलादारू पिउन पिउन आई मेली आणि मी लंडनहून भारतात आले ,मला वाटले वडील तरी आधार देतील मला पण ते तर मध्यप्रदेश मध्ये अनाथाश्रम चालवत होते ,स्वतःच्या मुलीला अनाथ करून बाप अनाथाश्रम चालवत होता ,कारण तिला सांभाळून समाजात नाव होणार नव्हते कि एखादी पद्मश्रीही मिळणार नव्हती ,आई बरोबर मला हा देश सोडून परदेशात राहावे लागले ,मला एका गवर्नेसच्या ताब्यात देऊन माझ्या आईने माझे शिक्षण पूर्ण केले, मी हि तिथे शिकले अगदी डॉक्टर व्हायचे ह्या जिद्दीने शिकले,विद्यापिठाच्या सर्व परीक्षात मी प्रथम श्रेणीत उतीर्ण होत होते कारण अभ्यासाशिवाय मला इतर काही आयुष्यच नव्हते ,नाना रंग उधळून आणि पिउन पिउन माझी आई हे जग सोडून गेली पण जाताना सांगून गेली कि तू मायदेशी परत जा ,आणि मी तिथून इथे आले आणि हा व्यवसाय स्विकारला , पंचम तुम्हाला पोहताना पाहून माझे बालपण पुन्हा एकदा जागे झाले ,तुमची टीचर म्हणून नव्हे तर मैत्रीण व्हायचे आहे मला ,हि मैत्री चालेल ना तुम्हाला ?
माझ्यासौंदर्यावर भाळणारे अनेक पुरुष मला भेटले,पण ज्याच्या मर्दानी सौंदर्यावर मी मोहित झाले असा एकच पुरुष मला दिसला ,आजपर्यंत मी माझ्याच सुंदरतेच्या गुंत्यात एवढी अडकलेली असायची कि दुसर्या कोणाकडे माझे लक्षच जात नसायचे ,माझा ब्रिटन मधला सहाध्यायी बुर्तोन नेहमी म्हणायचं कि कुंतल तू स्वतःच्या प्रेमात एवढी गुरफटली आहेस कि दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीवर तू प्रेमच करू शकणार नाहीस,तू आहेस एक पूर्ण प्रथम पुरशी एक वचन,you are male नार्सिसस .कोणावर प्रेम करणे शक्यच नाही तुला , मी मात्र त्याच्या ह्या सल्ल्या कडे दुर्लक्ष करून म्हणायचे ब्रूत ह्यात असूयेचा भाग किती आणि वस्तुस्तिती किती ?dam it तुझ्यासारख्या रबरी बाहुलीवर प्रेम करायला मी वेडा आहे का ?प्रेमाने तुझ्या ओठांवर ओठ ठेवताना आपल्या लिपस्टिक चा रंग पुसण्याची भीती मला तुझ्या डोळ्यात दिसेल आणि प्रणयाचे सगळे रंगच फिके होतील, अगदीच खोटे नव्हते त्याचे बोलणे आज मात्र मी मनोमन एका पुरषाच्या प्रेमात पडले होते , तलावात पोहायला आले आणि सपशेल प्रेमात पडले .एक व्यक्ती पोहत होती अन पोहता पोहता तो काठावर आला त्याचे शरीर पाण्यातच होते मला फक्त दिसत होते त्याचे काठावर विसावलेले दोन हात .लांब सडक बोटे आणि नखांचा गुलाबी सतेज रंग आणि पिळदार तरीही कोवळे वाटणारे दोन बलदंड बाहू आणि ते उभे करताना दिसणारी काखेतली नवथर कश्मीरी कलाकुसर,,मी त्याच्या नजरेला पडू नये म्हणून हळूच बाजूला लपले ,निशंक मानाने हातांवर जोर देऊन तो बाहेर आला ,त्याचा बलदंड बाहूंची हालचाल सांगून गेली कि ह्यांच्या मिठीत किती उबदारपणा असेल, एखादे संगमरवरी तरीही जिवंत शिल्पा पाण्यातून बाहेर यावे तसे त्याच अस्तित्त्वा भासत होते ,कुरळे दाट केस,उंच आणि भरीव मान बलिष्ठ तरीही कोवळ्या शिंगाराप्रमाणे भासणारी शरीर यष्टी ,राराशित संत्रांच्या फोडी सारखे दिसणारे ओठ,रुंद आणि बलिष्ठ छाती आणि त्यावर जडवलेली दोन माणके,अंगावर असलेल्या छोट्याश्या वस्त्रातून दृग्गोचर होणारे पौरुष्याचा अविष्कार ,छाती पासून नाभी पर्यंत उगवलेली एक सोनेरी केसांची नाजूक उभी पखरण , सौंदर्य हि किती मोहक असू शकते ह्याचा एक जिवंत अविष्कार माझ्या पुढे उभा होता ,,डोळे चोळून बघितले तर तो पंचम होता माझ्याच वर्गातला एक हुशार विद्यार्थी ,त्याच्या हुशारीची साक्ष म्हणजे अभ्यास,खेळ,वक्तृत्व सर्वच क्षेत्रात मिळालेली बक्षिसे ,अतिशय शांत स्वभावः हा विद्यार्थी सगळ्यांचाच आवडता होता ,त्यांच्या मित्र मैत्रिणींचा हिरो होता ,प्राध्यापक वर्गाचा आवडता शिष्य होता ,माझा मात्र त्याच्यशी फारसा संबध आला नाही. सौंदर्याच्या त्या प्रथमपुरुषी एक वचनी अविश्कारानी माझ्यातली मादी अचानक हुंकारली हा नर माझा आहेआहे. मला पंचम हवा होता ,आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार होते,पण आड येत होते हे गुरु शिष्याचे नाते.मम्मा नेहिमी म्हणायची की बेबी बिछान्यावर एकच नाते उरते ते म्हणजे नर आणि मादीचे ,,मम्माचा हा फंडा मला आवडला आणि त्याचाच उपयोग करायचे मी ठरवले. मला पंचम हवा होता ,आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार होते,पण आड येत होते हे गुरु शिष्याचे नाते.मम्मा नेहिमी म्हणायची की बेबी बिछान्यावर एकच नात उरते ते म्हणजे नर आणि मादीचे ,,मम्माचा हा फंडा मला आवडला आणि त्याचाच उपयोग करायचे मी ठरवले.
एक दिवस संध्याकाळी पोहता पोहता मी पडल्याचा बहाणा केला पंचम ला मला तलावातून गाडीत उचलून न्यावे लागले ,माझ्याच गाडीतून बंगल्यावर पोहचवायला सांगितले .पंचम माझ्या बरोबर बंगल्यात आला ,तलावातून बाहेर काढताना आणि मला पकडून घरी नेताना ,मी शक्यतो भार त्याच्या शरीरावर देत होते,त्याच्या मनातली चलबिचल मला जाणवत होती ,एक भीती ,एक न्यात्यानी उभे केलेले एक बंधन आणि तरीही त्या आडून उमटत जाणारी शरीराची हाक,सगळ कसे जमून येत होते.माझ्या बेड रूम मध्ये गेल्यावर आईग म्हणून मी जोरात ओरडले,काय झाल कुंतल पंचम म्हणाला ,आज प्रथमच प्रथम म्याडम आणि कुंतल न म्हणता तो सरळ कुंतल म्हणाला.काही नाही मला बेड वर चढता येत नाही आहे आणि मला हेल्प करायला सारजा बाई हि नाहीत ,मग काय झाले मी आहे ना,त्याचा घोघारा आवाज सांगत होता की त्याच्या तला नर जागा होतोय,आवाजात वेदना शक्य तितक्या जाग्या ठेऊन मी बोलत होते,मम्मा चे शब्द कानावर घोंगावत होते बेबी नराला त्याच्या पुढे पूर्णपणे अगतिक झालेली मादी पाहिजे असते ,कमीत कमी तस भासले तरी पाहिजे विजयाचा खोटा एक क्षण त्याला दे आणि कायमचे पराभूत कर.कारण अहंकार हि पुल्लीन्गीच असतो .बेबी अग कुठलेही नात्याचे नियम नर मादीच्या नात्यात उरतच नाहीत.पंचम ने अलगद मला उचलले आणि आपल्या बळकट बाहूंच्या आधाराने बेड वर ठेवले ,त्याच्या शरीराची धग मला जाणवत होती,त्याच्या बोटांची चाचपडणारी अग्रे मला सुखद स्पर्श जाणून देत होती.काळात होते की गुरु शिष्याच्या नात्याची आहुती आता ह्या भडकत्या आगीत दिलीच पाहिजे हा क्षण निसटला तर परत हि संधी यायचीच नाही.बेड वर मला ठेवताच न जाणे माझ्या नशिबाने कशी साथ दिली आणि रूम मधले लाईट गेले,संधी साधून मी पंचम ला घट्ट आवळले ,त्याच्यातला नर आता पूर्ण जागृत झाला होता ,अंधाराच्या साथीने त्याचीही भीड चेपली होती,मला त्याच्या अनाघ्रात पौरुष्याचा प्रमाथी गंध मोहवत होता,त्याच्या चाचपड णाऱ्या स्पर्शाला मी रस्ता दाखवत होते ,शरीराला शरीर भिडत होते ,,माझ्यातली मादी हुंकार घालत होती एका नराला,त्याचे पौरुष्या सामावून घेण्याचा माझा प्रयत्न मी करत होते ,एका सशक्त आवेगाने त्याची मिठी आवळली गेली शरीराला शरीर भिडले होते ,त्याचे हात मला जास्तीत जास्त जवळ घ्यायचा प्रयत्न करत होते,माझे हातही त्याच्या शरीरावरून फिरत होते ,त्याच्या मानेजवळ जाताच मला त्याची गळ्यातली चेन हाताला लागली ,त्याच्यात गुंफलेले तुळशीपत्र मला टोचू लागले ,आमच्या दोघात कुणीही तिसरे नको म्हणून मी त्या चेनला हिसडा मारला आणि ते बंधन दूर करण्याचा प्रयत्न केला ,,ति चेन तुटली आणि त्यातून ते तुळपत्र घरंगळून पडले पडता पडता त्याचा आवाज आला,त्या आवाजाने पंचमची मिठी सुटली अनोळखी माणसाला दूर करावे तसे त्यांनी मला दूर केले ,माझ्या अनावृत शरीरावर एक चादर घालून तो दूर झाला.जाता जाता माझ्या पायावर त्याने डोके ठेवले,त्याच्या डोळ्यातले काढत अश्रू माझ्या पायावर पडले.एक नाजूक निर्जीव तुळशीपत्र पराभवाचे माप माझ्या पदरात घालून गेले.सौरी मादाम म्हणून मला पंचम दूर लोटून गेला. आग विझली आणि आणि मी मात्र पूर्णपणे जळून गेले ,अस काय झाले की माझ्यातली मादी हरली होती,काहीच कळेना ,पण एवढे मात्र कळून चुकले की मला नर भेटला नव्हता तर एक पुरुष भेटला होता माझ्यातली मादी त्याच्या पुढे हरली होती.हा अध्याय आता संपला होता ,.ग्लानी ने झोप आली ,स्वप्नात दिसले एक दिमाखदार तुलसीपत्र ,सुंदर नाजूक आणि विजयी भासणारे,आणि मी एका कोपऱ्यात पडलेली दिसत होते सुकलेल्या निर्माल्या सारखी.जे देवपूजेला न वापरता च सुकले होते..माझ्यातल्या मादीचा हा सपशेल पराभव होता ,मम्माने सगळ सांगितले पण एक मात्र ती विसरली ते म्हणजे शरीर आणि मन कधी कोण कोणावर मात करतील सांगता येत नाही.सकाळी उठून वर्गावर जायचे नव्हतेच सुट्ट्या लागल्या होत्या नोकरीचे राजीनामा पत्र लिहून मी प्राचार्यांच्या हातात दिले.मी आता मोकळी झाले होते ,विषयाच्या सर्व बंधातून मुक्त झाले होते ,घरी आल्याआल्या बाबांना फोन केला त्यांना सांगितले मी त्यांच्या आश्रमात येतेय म्हणून ,ये बाळ तुझी इथे गरज आहे ,बाबा म्हणाले.गाडी काढली आणि निघाले जाताना माझ्या जवळ होते ते महावस्त्र जे पंचम ने माझ्या शरीरावर घातले होते..



.jpg)

No comments:
Post a Comment